भाजपने बूथ प्रमुखांच्या बळावर निवडणुका जिंकल्या- संभाजी पाटील निलंगेकर

On: October 28, 2024 5:41 PM
---Advertisement---

BJP l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक महत्वाचं भाष्य केलं आहे. बुथ प्रमुखांच्या कामगिरीच्या बळावरच भारतीय जनता पक्षाने आजवर अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा असून आगामी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असल्याने त्या दृष्टीने बुथ प्रमुखांनी कामाला लागण्याचे आवाहन माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

बूथ प्रमुखांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी :

यावेळी आ.निलंगेकर म्हणाले की, आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बूथप्रमुखांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तसेच राज्याच्या भवितव्यासाठी यादवही विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं निलंगेकर म्हणाले आहेत.

याशिवाय राज्यातील बूथप्रमुखांनी प्रत्येक मतदाराशी संपर्क साधत केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती मतदारांना देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच भाजप पक्षाने केलेली विकासकामे मतदारांना सांगायला लावले आहे.

BJP l 25 दिवस पक्षासाठी द्या :

तसेच या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार व महाविकास आघाडी सरकारच्या संपूर्ण कार्याची तुलना देखील होणार आहे. मात्र आता मतदारांना सतत संपर्कात राहणारा उमेदवार हवा? की केवळ बोलघेवडा माणूस हवाय याचा देखील निर्णय करावा लागणार आहे.

याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे बूथप्रमुखांनी ही बाब मतदारांच्या देखील निदर्शनास आणून द्यावी आणि आगामी 25 दिवस स्वतःला पक्षासाठी झोकून देत निलंगा विधानसभेसह राज्यात महायुतीचा झेंडा फडकवावा असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निलंगा मतदारसंघातील निटूर,अंबुलगा आणि शेडोळ गटातील बुथ प्रमुखांच्या विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ.निलंगेकर बोलत होते.

News Title –  Sambhajirao patil nilangekar statement on bjp vidhansabha

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची नावे जाहीर

मनोज जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर खेळणार मोठा डाव

भोसरीत भाजपच्या लांडगेंचा टांगा पलटी होणार, लांडे घोडे फरार करणार?

भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का

जळगावात महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now