Santosh Deshmukh Case | महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्याच्या राजकारणात एक नवीन वळण आणलं आहे. या हत्येप्रकरणी विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. आज (28 डिसेंबर) रोजी बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, याचपार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकऱ्यांचे पक्षाचे नेते संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhosale) यांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बीडला बिहार करायचंय का ?
बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, यावरून संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhosale) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “बीड जिल्ह्याला बिहारसारखं करायचं आहे का? या जिल्ह्यात गुन्हेगारी इतकी वाढली आहे की नागरिकांना भीती वाटू लागली आहे.” संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील नागरिक आणि नेते सर्वांनीच या गुन्ह्याच्या तीव्रतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
या बरोबरच माध्यमांशी बोलत असताना संभाजी राजे भोसले म्हणाले की, हे दुर्देवी आहे, क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे वेदनादायी आहे. वाईट आहे, जे आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाही. वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय. त्याचे आश्रयदाते यांचा राजीनामा का घेत नाही? मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं, यांना मंत्रिपद देऊ नका. यांना मंत्रिपद दिलं, तर न्याय देण्यात गडबड होऊ शकते” अशा शब्दात संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा रोख धनंजय मुंडेंकडे होता.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा-
संभाजीराजे भोसले यांनी या प्रकरणातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “हा कुठल्या जातीचा मोर्चा नाही, हा न्यायाचा मोर्चा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्व समाजालाच धक्का बसला आहे आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळायला हवी.” संभाजीराजे भोसले यांनी अजित पवार यांना या प्रकरणाची गंभीरता सांगितली असून, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव प्रमुखपणे समोर आलं आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे राइट हँड मानले जातात. विरोधकांनी मांडलेल्या मागणीनुसार वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीराजे भोसले यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
News Title : sambhaji raje bhosale on santosh deshmukh case
महत्त्वाच्या बातम्या-
प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने मनसे नेता आक्रमक, सुरेश धसांना झापलं
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!
पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा
क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दं






