‘ड्रेस घातलेल्या महिलांनी…’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वटसावित्री पुजा करताना कसा पेहराव असावा यावर  संभाजी भिडेंनी भाष्य केलं आहे. त्यांचं नवं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

संभाजी भिडेेंचं नवं वक्तव्य

वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये, असे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले आहेत. ड्रेस परिधान केलेल्या महिलांनीदेखील वटसावित्रीसाठी जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनीच वटसावित्रीला जावं, असे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले आहेत.

वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचंय असे ते यावेळी आपल्या समर्थकांना सांगताना दिसत आहेत.

आपल्या जे स्वातंत्र्य मिळालं ते…- संभाजी भिडे

संभाजी भिडे हे देशाच्या स्वातंत्र्यावर बोलताना दिसतात. आपल्या जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडग आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वतंत्र आहे, असं संभाजी भिडेंनी सांगितलं. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत, ह्या व्रताची पथ्य आहेत, असं संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणालेत.

ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा 10 – 10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणारं असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजरांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य!

रोहित शर्माने बारबाडोसच्या मैदानात रोवला भारताचा झेंडा; व्हिडोओ बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘अंपायरने गडबडीत चुकीचा निर्णय दिला’; आफ्रिका मीडियाचा मोठा दावा

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांना धक्का

‘मी आरडाओरडा केला आणि काढ ती बंदूक म्हणाले…’; रुपाली ठोंबरेंसोबत घडला भयानक प्रकार