गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..

On: June 13, 2024 1:55 PM
Salman Khan
---Advertisement---

Salman Khan | बॉलीवुड स्टार सलमान खान याच्या अपार्टमेंटबाहेर काही दिवसांपुर्वी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचा जबाब नोंदवला आहे. सलमानने पोलिसांसमोर जबाब नोंदवताना हताश होऊन निराशा व्यक्त केली असल्याची माहिती आहे. सलमानने या प्रकरणी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

एप्रिलमध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. तेव्हापासूनच सलमानला सतत बिष्णोई गँगपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

सलमानचा मुंबई क्राइम ब्रांचने जबाब नोंदवला

काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्यासह चार सदस्यीय टीमने सलमानचा या प्रकरणी जबाब नोंदवला आहे. गोळीबाराच्या घटनेच्या आदल्या रात्री एका पार्टीनंतर उशिरा घरी पोहोचला असल्याचं सलमानने सांगितलं आहे. त्यानंतर पहाटे गोळी चालवल्याचा आवाज आल्याने सलमानने बाहेर जाऊन बघितले. यावेळी सलमानला एक गोळी बाल्कनीच्या भिंतीला लागली असल्याचं दिसून आलं.बाहेर पाहिलं तर मला कोणीही दिसलं नाही, असं जबाबात सलमानने पोलिसांना सांगितलं.

ही घटना घडली तेव्हा सलमानचा भाऊ अरबाज त्याच्या जुहूमधल्या घरात होता. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या सलमानला येत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.  त्यामुळे पोलिसांनी सलमानची (Salman Khan ) तीन तास तर अरबाजची दोन तास चौकशी केली.

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता

गोळीबार झाला त्यावेळी सलमानचे वडील सलीम खानसुद्धा घरात उपस्थित होते. मात्र त्यांच्या वयोमानाचा विचार करता त्यांची चौकशी करण्यात आली नाही.पोलिसांनी सलमान (Salman Khan ) आणि अरबाज यांना बरेच प्रश्न विचारले होते. या प्रकरणी आतापर्यंत 6 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. तर अनुज थापन आणि आणखी एका व्यक्तीला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. तर, यामधील अनुजने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. पोलिस या प्रकरणी अजूनही तपास करत आहेत.

News Title-  Salman Khan Statement Recorded Over Firing Incident

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांना धक्का! आता ATM मधून पैसे काढण्यासाठीही मोजावे लागणार पैसे

“उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा…”; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

‘निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ’; रूपाली ठोंबरे पक्षात नाराज?

पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती

अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब

Join WhatsApp Group

Join Now