सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!

On: June 20, 2024 8:36 PM
Lawrence Bishnoi
---Advertisement---

Salman Khan Firing | लॉरेन्स बिश्नोई कोण? हे सांगायची आवश्यकता नाही. कुख्यात गुंड म्हणून त्याची ओळख आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल्याच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात होता. त्यानंतर दोन महिन्यांआधी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानच्या मुंबई येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने त्याची जबाबदारी घेतली होती. यामुळे आता याप्रकरणात कसून चौकशी केली जात आहे. यातून वेगवेगळी माहिती समोर येताना दिसतेय. (Salman Khan Firing)

लॉरेन्स बिश्नोईकडून माहिती मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचा खटाटोप

लॉरेन्स बिश्नोईकडून माहिती काढून घेण्यासाठी मुंबई पोलीस सक्रिय आहेत. त्यांचा यासाठीच खटाटोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. एवढंच काय तर काही दिवसांआधी सलमान खान गोळीबार (Salman Khan Firing) प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. एका अल्पवयीन मुलाचा वापर करून सलमान खानला संपवण्याचा नियोजनबद्ध कट हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा होता.

या प्रकरणी आता राज्य सरकार केंद्रीय गृहविभागाची मदत घेणार असून त्यासंदर्भात गृहविभागाला पत्रही लिहीण्यात आलं आहे. पोलिसांना लॉरेन्सची चौकशी करायची आहे. यातून आता महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात. लॉरेन्स हा कुख्यात गुंड असल्याने लॉरेन्ससारख्या अनेक गुन्हेगाऱ्यांना जेलबंद केलं जातं. अशातच आता मुंबई पोलीस गृहविभागाच्या उत्तराची वाट पाहत आहे. (Salman Khan Firing)

नेमकं काय घडलं होतं?

14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार पहाटे पाचच्या सुमारास करण्यात आला. त्यावेळी सलमान खान घरीच होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनं पुरतं बॉलिवूड आणि मुंबई हादरून गेली होती. याप्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली. (Salman Khan Firing)

घडलेल्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे इतर काही नेते मंडळी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर भेटीस गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी लॉरेन्स बिश्नोईचा खात्मा करू, असं वक्तव्य केलं आहे. याचा तपास अद्यापही सुरू आहे. यासाठी राज्य सराकर हे केंद्रीय गृहविभागाला मदतीचा हात मगत आहे. (Salman Khan Firing)

News Title – Salman Khan Firing News Update Lawrence Bishnoi

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही’

महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

पुण्यासह या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; यलो अलर्ट जारी

मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय!

या राशीच्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागणार

 

Join WhatsApp Group

Join Now