‘जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा…’; सलमान खानचं वक्तव्य चर्चेत

Salman Khan | अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा अनेक कारणाने चर्चेत असतो. त्याला त्याच्या लग्नावरून देखील अनेकदा विचारलं जातं. मात्र तो कधीच काही बोलत नाही. तो त्याच्या चित्रपटांना घेऊन नेहमी चर्चेत दिसतो. दरम्यान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांची संख्या मोठी आहे. सलमानने चांगला आणि वाईट असे दोन्ही काळ अनुभवलेत. असं असलं तरीही सलमानच्या लिस्टमधील एकही चाहता कमी झाला नाही.

अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सलमानचे चाहते आहेत. ते सलमानला कधीच अंतर देत नाहीत. सलमानने हे याआधी अनेकदा अनुभवलं आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता निकितन धीर याने सलमान याला विचारलं होतं. तेव्हा भाईजानने दिलेलं उत्तर ऐकून निकितन धीर थक्का झाला.

डोंगराखाली राहणारी व्यक्तीही तुला ओळखते? सलमान म्हणला…

निकितन धीर म्हणाला होता की, मी सलमानला विचारलं होतं की तुला कसं वाटतं डोंगराखाली राहणारी व्यक्तीही तुला ओळखते? या प्रश्नावर सलमानने अजबच उत्तर दिलं होतं. ते उत्तर ऐकून निकितन धीर हा थक्क झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सलमानने उत्तर देताना सांगितलं की, “सर्वकाही ठिक आहे, पण जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल ना तेव्हा मला हीच लोकं शिव्या घालतील. त्यामुळे आपल्याला माहिती असायला हवं आपण कोण आहोत…”, असं सलमान (Salman Khan) म्हणाला होता.

त्यानंतर निकितन धीर म्हणाला की, “दबंग 2 सिनेमाची शुटिंग सुरू होती. शुटिंगसाठी 50 बॉडिगार्डसह सलमान खान यांच्यासोबत गावात पोहोचले होते. तेव्हा सलमान याला पाहण्यासाठी जमा झालेल्या चाहत्यांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवणं कठीण झालं होतं. यांच्यासोबत अनेक अभिनेत्यांनी सलमानला वाचवलं होतं.

सलमान खानचे चाहते केवळ भारत देशापुरते मर्यादीत नाहीयेत. तर ते सातासमुद्रापलिकडे देखील आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सलमान खान हा कधीच आपल्या चाहत्यांवर नाराज होत नाही.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार

सलमान खान (Salman Khan) हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच नुकताच सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर बिश्नोई गँगच्या काही अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तर काहीजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. याप्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येताना दिसत आहेत.

News Title – Salman Khan Answer About His Fan

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पंकजा मुंडेंविषयी तरूणाची आक्षेपार्ह पोस्ट, पाथर्डी बंदची हाक

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’

शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

“राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, थांबा बोलले तर थांबणार”

ठरलं! 9 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ