वर्षांनंतर सलमान-ऐश्वर्या आले पुन्हा एकत्र?, ‘त्या’ फोटोने चर्चेला उधाण

On: July 14, 2024 1:40 PM
Salman Khan-Aishwarya Rai photo viral
---Advertisement---

Salman Khan-Aishwarya Rai | 12 जुलैरोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये बच्चन कुटुंब देखील होतं.

मात्र, ऐश्वर्या (Salman Khan-Aishwarya Rai )ही लेक आराध्या हिच्यासोबत वेगळी लग्नात सामिल झाली. बच्चन कुटुंबियांना एकत्र आणि ऐश्वर्या – आराध्या यांना वेगळं पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना वेगवेगळं बघून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या.

बच्चन कुटुंबाला सोडून ऐश्वर्या लेकीसह..

अशात ऐश्वर्या आणि सलमान खानबाबतही चर्चा होत आहेत. अभिषेक सोबत लग्न करण्यापुर्वी ऐश्वर्या ही सलमान खानच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र, हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर त्यांच्यात जोरदार भांडण झाली. त्यांच्यातील वाद इतके टोकाला गेले की, ऐश्वर्याने सलमान सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. पुढे तिचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉयसोबतही जोडलं गेलं. मात्र, जीवनसाथी म्हणून ऐश्वर्याने अभिषेक बच्चनची निवड केली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बऱ्याच चर्चा होत आहेत. त्यातच दोनच दिवसांपुर्वी झालेल्या अंबानी यांच्या विवाह सोहळ्यातही ऐश्वर्या संपूर्ण कुटुंबाला सोडून फक्त लेकीसोबतच उपस्थित झाली. त्यामुळे बच्चन कुटुंबियात पुन्हा एकदा बिनसल्याची चर्चा सुरू झाली. ते होत नाही तर, आता सलमान खान आणि ऐश्वर्या (Salman Khan-Aishwarya Rai ) हे पुन्हा एकत्र आले असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

ऐश्वर्या आणि सलमान खान यांचा फोटो व्हायरल

अनेक कार्यक्रमामध्ये सलमान आणि ऐश्वर्या बऱ्याचदा सहभागी झाले आहेत. मात्र, त्यांनी कधीच एकमेकांशी संवाद साधला नाही.अशात त्यांचा अनंत अंबानीच्या लग्नातील एक फोटो तूफान व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रतिक्रिया देताना दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत सलमानची लहान बहीण अर्पिता शर्मा देखील दिसत आहे. सोशल मीडियावर तिघांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

मात्र, या व्हायरल फोटोबद्दल सांगायचं झालं तर, अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नात सलमान-ऐश्वर्या सामिल झाले होते. पण त्यांनी एकत्र कोणताही फोटो घेतलेला नाही. व्हायरल होणारा फोटो हा फेक असून AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. मात्र, या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो बघून ऐश्वर्या (Salman Khan-Aishwarya Rai ) आणि सलमान पुन्हा एकत्र आले की काय?, अशा चर्चा आता होत आहेत.

News Title-  Salman Khan-Aishwarya Rai photo viral 

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्रात जातीयवाद सुरूये, माझ्या मतदारसंघात 40 टक्के दलित व मुस्लिम तरी मी निवडून येतो”

“…तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही”; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

मुंबई, कोकणसह राज्यातील ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

“माझ्यावर गुन्हा झाला तरी..”, विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

मुंबई पुन्हा तुंबणार?, पुण्यातही पावसाचं थैमान

Join WhatsApp Group

Join Now