“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!

On: October 22, 2024 9:24 PM
sakshi malik
---Advertisement---

Sakshi Malik | महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक आत्याचार प्रकरणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारी साक्षी मलिक सध्या तिच्या विधानाने चर्चेत आहे. बालपणी आपल्यासोबत घडलेला प्रकार आई-वडिलांपासून लपून ठेवला होता. मात्र माझीच चुक आहे, असं साक्षीला वाटत असल्याने तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार आपल्या घरातल्यांना सांगितला नाही. दरम्यान साक्षीने ‘व्हिटनेस’ या आत्मचरित्रात याबद्दल खुलासा केला आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली.

काय म्हणाली साक्षी?

कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘व्हिटनेस’ या आत्मचरित्रात साक्षीने तिच्या शालेय जिवनात तिच्याबरोबर किळसवाणा प्रकार घडला होता. साक्षी म्हणाली की, माझे शिक्षक कोणत्याही वेळी मला घरी बोलवायचे आणि ते माझ्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे.

मला भिती वाटायची-

पुढे ती (Sakshi Malik) म्हणाली की, अनेकवेळा मला ट्यूशनला जायला भीती देखील वाटायची. माझ्यासोबत असा किळसवाणा प्रकार घडला मात्र, मी माझ्या आई वडिलांना कधीच सांगितलं नाही. कारण मला असं वाटायचं की, माझीच सगळी चुक आहे, त्यामुळे माझ्या आई वडिलांपासून ही गोष्ट मी लपून ठेवली आहे. साक्षीने ही गोष्ट ‘व्हिटनेस’ या आत्मचरित्रात मांडली आहे.

News Title : sakshi malik shocking revelation about her teacher

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार; एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार?

भाजपला विदर्भात मोठा धक्का! बडा नेता राष्ट्रवादीत

लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर; कोणी दिली ऑफर?

शरद पवारांचा शिंदे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने तुतारी फुंकली

पुण्यात राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र केसरीच्या घरावर ईडीची धाड!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now