Saif Ali Khan property l अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या राहत्या घरी हल्ला (Attack) झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) उपचार सुरू आहेत. या घटनेने बॉलिवूड (Bollywood) आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर चर्चेत आलेल्या सैफ अली खानबद्दल अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे. ‘छोटे नवाब’ म्हणून ओळख असलेल्या सैफच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.
या हल्ल्यासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. इमारतीच्या पाईपवरून चढून हल्लेखोर तैमूरच्या (Taimur) खोलीत शिरला होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सैफ अली खानची एकूण संपत्ती :
सैफ अली खानची एकूण संपत्ती १२०० कोटींच्या घरात असल्याचा अंदाज मीडिया रिपोर्ट्समधून (Media Reports) वर्तवण्यात येत आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी (Movie) जवळपास १०-१५ कोटी रुपये मानधन (Fees) घेतो. तसेच, ब्रँडच्या (Brand) जाहिरातींमधून तो जवळपास दीड कोटी रुपये कमावतो.
Saif Ali Khan property l मुंबईतील आलिशान घरे :
सैफचे वांद्रे (Bandra) परिसरात दोन आलिशान अपार्टमेंट (Apartment) आहेत. हल्लेखोर याच वांद्रे येथील चार मजली अपार्टमेंटमध्ये शिरला होता. या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावर एक सुसज्ज हॉल आणि तीन बेडरूम (Bedroom) आहेत.
याशिवाय, वांद्रे येथेच सैफचे ‘फॉर्च्यून हाईट्स’ (Fortune Heights) नावाचे आणखी एक अपार्टमेंट आहे. लग्नानंतर (Marriage) करीना आणि सैफ याच अपार्टमेंटमध्ये राहत होते. या घरात ११ वर्षे राहिल्यानंतर ते ‘सतगुरू शरण’ (Satguru Sharan) नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. ‘सतगुरू शरण’ अपार्टमेंटची किंमत अंदाजे १०३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते, तर ‘फॉर्च्यून हाईट्स’ची किंमत जवळपास ५० कोटी रुपये आहे. सध्या त्यांनी ‘फॉर्च्यून हाईट्स’ हे घर भाड्याने (Rent) दिले आहे.
परदेशातील मालमत्ता आणि इतर व्यवसाय
सैफ आणि करीना यांचे स्वित्झर्लंडमधील (Switzerland) गस्ताद (Gstaad) येथे एक लग्झरी (Luxury) घर आहे, ज्याची किंमत अंदाजे ३३ कोटी रुपये आहे. २०१८ मध्ये सैफने कपड्यांचा ब्रँड (Brand) सुरू केला होता, ज्यातून त्याला कोट्यवधी रुपयांचा नफा होतो. तो ‘टायगर्स ऑफ कोलकाता’ (Tigers of Kolkata) या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील (Indian Street Premier League) संघाचा मालकदेखील आहे.
लक्झरी कार्सचा ताफा
सैफकडे अनेक लक्झरी गाड्यांचा (Luxury Cars) ताफा आहे. यामध्ये मर्सिडीज बेंझ एस क्लास 350 डी (Mercedes Benz S Class 350 D), लँड रोव्हर डिफेंडर 110 (Land Rover Defender 110) आणि ऑडी क्यू7 (Audi Q7) या गाड्यांचा समावेश आहे.
पतौडी पॅलेस
सैफच्या संपत्तीचा मोठा हिस्सा हा त्याचा वंशपरंपरागत पतौडी पॅलेस (Pataudi Palace) आहे. हरियाणामध्ये (Haryana) असलेला हा महाल जवळपास ८०० कोटी रुपयांचा आहे. या महालाला ‘इब्राहिम कोठी’ (Ibrahim Kothi) असेही म्हटले जाते. १० एकरांपेक्षा जास्त परिसरात हा महाल पसरलेला आहे.
आठवे पतौडी नवाब, इफ्तिखार अली खान (Iftikhar Ali Khan) यांनी १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला या महालाची निर्मिती केली होती. दिल्लीतील (Delhi) इंपिरियल हॉटेलपासून (Imperial Hotel) प्रेरणा घेऊन, शाही वारसा आणि वास्तुकलेचा मिलाफ असणारा हा महाल बांधण्यात आला आहे.
पतौडी पॅलेसची वैशिष्ट्ये
या महालात भव्य बेडरूम्स, आकर्षक डिझाईन्स, आरामदायी फायरप्लेस (Fireplace) आणि सुंदर बाल्कनी (Balcony) आहेत. प्रशस्त डायनिंग हॉल (Dining Hall), मोठी खिडकी, २२ आसनांचे टेबल आणि सुंदर झुंबर (Chandelier) हे या महालाचे आणखी एक वैशिष्ट्य. मनोरंजनासाठी या महालात सात खोल्या असून, त्यामध्ये एक बिलियर्ड्स रूम (Billiards Room), मुलांसाठी खेळण्याचे मैदान आणि एक ग्रंथालय (Library) देखील आहे.
News Title: Saif Ali Khan attacked, know about his massive property
महत्वाच्या बातम्या-
धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ, आता ‘ते’ प्रकरण देखील भोवणार?
हवामानात मोठा बदल होणार?; पंजाबराव डख यांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
बीड पुन्हा हादरलं, अत्यंत धक्कादायक घटना समोर
अभिनेता सैफ अली खानच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!






