अघोरी कृत्यामुळे गोगावलेंच मंत्रिपद धोक्यात?, सचिन खरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

On: June 19, 2025 2:14 PM
Sachin Kharat
---Advertisement---

Sachin Kharat | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक घटना समोर आली आहे. मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी अघोरी पूजा केल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. अशातच आता यासंदर्भात सचिन खरात (Sachin kharat) यांनी या प्रकरणाची चौकशी करून गोगावले यांची तात्काळ मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

सचिन खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी दावा केला की, भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी अघोरी पूजा केली असून ही लोकशाहीविरोधी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृती आहे. “जनतेसाठी काम करणाऱ्या मंत्र्यांनी अशा प्रकारच्या अघोरी कृत्यांना शरण जाणं हे अत्यंत लाजीरवाणं आहे,” असं खरात यांनी ठामपणे म्हटलं.

अंधश्रद्धेचा प्रचार आणि कायद्याचा भंग? :

खरात यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही राज्याचे मंत्रीच जर अशा अघोरी कृती करत असतील तर सामान्य जनतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. “हे सरकार विज्ञानवादी विचारांची भाषा बोलतं, पण कृती मात्र अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आहे,” अशी टीका त्यांनी केली. (Bharat Gogawale)

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनीही व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी गोगावले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गोगावले यांनी उत्तर द्यावं – विरोधकांची मागणी :

दरम्यान, विरोधकांनीही याबाबत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याकडून स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. जर त्यांनी प्रत्यक्षात अघोरी पूजा केली असेल, तर त्यांनी मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही, असं विरोधक म्हणतात.

या प्रकारामुळे राज्य सरकारची प्रतिमा धोक्यात आली असून अंधश्रद्धेच्या विरोधात उभं राहणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागलं आहे. आता सरकार यावर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title: Sack Minister Bharat Gogawale for Performing Occult Ritual, Demands Sachin Kharat

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now