‘निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ’; रूपाली ठोंबरे पक्षात नाराज?

On: June 13, 2024 12:13 PM
Rupali patil thombare
---Advertisement---

Rupali Thombare | महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. यामध्ये महायुतीला महाविकास आघाडीने पाणी पाजल्याचं दिसून आलं आहे. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. महायुतीने 17 जागांवर विजय मिळवला. मात्र अशातच महायुतीत मोठ्या प्रमाणात भूकंप होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरेंबाबत (Rupali Thombare) ट्विट केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombare) या अजित पवार गटात आहेत. त्या आता शरद पवार गटात जाणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार गटातील अनेक नेते हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा आता शरद पवार गटातील नेत्यांनी केला आहे. (Rupali Thombare)

काही जणांना पक्षात संधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत, ते लवकरच पक्षाला राम राम ठोकतील. लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीला आहे. दरम्यान लोकसभेला शरद पवारांनी आपला करिष्मा दाखवला आहे.

काय केलं ट्विट

“निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…”, असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरेंची पक्षात मुस्कटदाबी होताना दिसत असल्याचा आरोप केला. या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्याचं दिसून आलं. यावर अद्यापही रूपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

राजकीय भूकंपाची शक्यता

महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला आहे. यामुळे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीतील काही नेते हे लवकरच शरद पवार यांच्या गटात येतील अशी शक्यता आहे.

News Title – Rupali Thombare Will Left NCP Ajit pawar About Sushma Andhare Tweet Viral

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती

अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! फळपिक विम्याची मुदत राज्य सरकारने वाढवली

मला तिकिट मिळू नये, त्यासाठी पक्षातील लोकांनी सुपारी दिली; या खासदाराचा धक्कादायक आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बजरंग सोनावणेंनी आखला पुढील मास्टर प्लॅन

Join WhatsApp Group

Join Now