Ruksana Bano | सुप्रसिद्ध गायिका रुक्साना बानोनी जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या जाण्याने म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रुक्सानाच्या निधनानं तिचे चाहते आणि समाजातील लोकांना धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध संबलपुरी गायिका रुक्साना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान, उपचार सुरु असताना रुक्सानाचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
दिल्लीतील एम्स रुग्णालयात रुक्सानावर (Ruksana Bano) उपचार सुरु होते. मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतरही रुक्सानाचे प्राण वाचू शकले नाहीत. तिनं बुधवारी (18 सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. रुक्सानावर विषप्रयोग झाल्याचं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुक्सानाला दुसऱ्या संबलपुरी गायिकेनं स्लो पॉयझन देऊन हळूहळू संपवलं आहे.
View this post on Instagram
रुक्सानावर उपचार-
15 दिवसांपूर्वी एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान रुक्साना आजारी पडल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे. 27 ऑगस्ट रोजी रुक्सानाला (Ruksana Bano) भवानीपटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना बोलंगीर भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालयात आणि नंतर बारगढमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं रुक्सानाला एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे बराच काळ उपचार घेतल्यानंतर तिनं अखेरचा श्वास घेतला.
News Title : Ruksana bano sambalpuri singer dies
महत्त्वाच्या बातम्या-
खासगी आयुष्याबदल तृप्ती डिमरीचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘कोणत्या धंद्यात…’
पितृपक्षात पूर्वज ‘या’ चार रूपात येतात, चुकूनही त्यांचा अपमान करू नका
खुशखबर! जिओकडून ग्राहकांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट
बापरे! तिरुपती प्रसादाच्या लाडूत चक्क ‘या’ प्राण्यांची चरबी; देवस्थान समितीचे सदस्य म्हणाले…
सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता






