RR vs DC | जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज (28 मार्च) IPL 2024 च्या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सशी (DC) सामना करेल. आज दोन्ही यष्टीरक्षकांची लढाई असेल. आयपीएल हंगामातील हा नववा सामना असणार आहे.
राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पहिला विजय नोंदवला आहे. कर्णधार सॅमसनने नाबाद अर्धशतक झळकावल्याने राजस्थानला विजयी सुरुवात मिळाली. यात रियान परागनेही मोलाचं योगदान दिलं.
तर, दुसरीकडे पंजाब किंग्ज (PBKS) कडून पराभूत झाल्यामुळे दिल्लीची त्यांच्या IPL हंगामाची चांगली सुरुवात झाली नाही. डीसीने पहिल्या डावात 174 धावा केल्या होत्या. पंजाबने हा सामना चार विकेट्सने जिंकला. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
दिल्ली कॅपिटल्ससमोर vs राजस्थान रॉयल्स
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने दुखापतीतून सावरल्यानंतर पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 18 धावा केल्या होत्या. त्यामुळे आज राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास पंत उत्सुक असेल. पंतला लय सापडल्यास संघालाही (RR vs DC ) त्याचा फायदा होईल. पंतला या वेळी ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांसारख्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करायचा आहे.
राजस्थानचा संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने दिल्लीचा संघ त्यांना हलक्याने घेणार नाही. त्यामुळे दोन्ही संघात आज चुरशीची लढाई होईल. दिल्लीला राजस्थानच्या फलंदाजांना रोखायचं झाल्यास कुलदीप व अक्षर यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील. तर, राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा यांनीही गोलंदाजीत चमक दाखवली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11
राजस्थान रॉयल्स (RR) संभाव्य प्लेयिंग 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C & WK), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा
दिल्ली कॅपिटल्स (DC) संभाव्य प्लेयिंग 11 : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (C & WK), कुमार कुशाग्रा, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार
सामन्यांचे थेट प्रक्षेपण कोठे पाहावे?
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC ) यांच्यात आज 7 : 30 वाजता सामना होईल. याचे थेट प्रक्षेपण तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता. तर, मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर सामना पाहू शकता.
News Title : RR vs DC Match today
महत्त्वाच्या बातम्या-
निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी
‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!
समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा
‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल






