Rohit Sharma-Virat Kohli | भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रिकेटमधून संन्यास जाहीर करू शकतात. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी तत्काळ टी20 फॉरमॅटचा निरोप घेतला होता, आणि वनडेबाबतही तसाच निर्णय घेतला जाईल का, यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. (Rohit Sharma-Virat Kohli )
आकाश चोप्रा यांनी दिले मोठे संकेत
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी या चर्चेला अधिक हवा दिली आहे. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, “हे पूर्णपणे रोहित आणि कोहली यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. कोहलीने 2025 मध्ये चांगली फलंदाजी केली आहे, तर रोहितचे प्रदर्शन ठीकठाक राहिले आहे. ते अंतिम सामन्यात मोठी खेळी करून आकडेवारी बदलू शकतात. 2027 चा वनडे विश्वचषक अजून दोन वर्षांनी असल्याने ते वनडे फॉरमॅटमधून संन्यासाचा विचार करू शकतात.”
“त्यांचा पुढील निर्णय अज्ञात” – चोप्रा
आकाश चोप्रा पुढे म्हणाले, “जर कोणी मला विचारले की ते कधी संन्यास घेतील, तर मी म्हणेन की मला माहीत नाही. टी20 विश्वचषकानंतर त्यांनी संन्यासाची घोषणा केली ते अपेक्षित होते, पण जर ते वनडे आणि टी20 दोन्ही सोडून फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असतील, तर ते आश्चर्यकारक असेल. ते हा मार्ग निवडतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.”
वनडे वर्ल्ड कप 2027 साठी दोघे उपलब्ध राहतील का?
विराट कोहली 36 वर्षांचा, तर रोहित शर्मा 37 वर्षांचा झाला आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी हे दोघे स्वतःला तयार ठेवतील का, की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेटमधील त्यांचा काळ संपेल, हा मोठा प्रश्न आहे.
Title : Rohit Sharma-Virat Kohli ODI Retirement Rumors






