रोहित शर्माने बारबाडोसच्या मैदानात रोवला भारताचा झेंडा; व्हिडोओ बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Rohit Sharma | ICC विजेतेपदासाठी 11 वर्षांची प्रतीक्षा संपवून भारताने अत्यंत रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून T20 विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील अधुरं स्वप्न अखेर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण झालं, तेव्हा रोहित शर्माच्या संघासह टीव्हीसमोर बसलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचे डोळे भरून आले होते. या आयसीसी विजेतेपदासाठी 11 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा होती आणि विजयाचा नायक विराट कोहली होता ज्याने विजयासोबतच टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला.

भारताने 2007 मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकला आणि महें द्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे ICC विजेतेपद होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली होती.

रोहित शर्माने मैदानात रोवला भारताचा झेंडा

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमधील विजयानंतर बार्बाडोसच्या मैदानावर भारताचा झेंडा रोवला.  यादरम्यान रोहितसोबत जय शाह आणि हार्दिक पंड्या देखील तिरंगा घेऊन उपस्थित होते.

14 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमात जय शाह यांनी घोषणा केली होती की, आम्ही T20 विश्वचषक स्पर्धेत ध्वज रोवू. त्यावेळी टी-20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं, परंतु टीम इंडिया कोणाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळणार हे स्पष्ट झालं नव्हतं. त्यानंतर टीम विश्वचषक खेळणार आहे भारत टी-20 विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल असं जाहीर करण्यात आलं.  जय शाह यांनी केलेली घोषणा रोहित शर्माने मैदानावर भारताचा झेंडा रोवत पूर्णत्वास आणली.

रोहित शर्माने बार्बाडोसच्या मैदानावर भारताचा झेंडा रोवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहतान एक भारतीय म्हणून तुमचा उर खरच अभिमानाने भरुन येईल.

रोहित आणि विराटच्या निर्णयामुळे निराशा

टीम इंडिया आणि देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहते आनंद साजरा करत असतानाच विराट कोहलीनं टी 20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या या निर्णयानंतर भारतीय चाहते सावरत असतानाच मॅच संपल्यानंतर रोहित शर्मानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘अंपायरने गडबडीत चुकीचा निर्णय दिला’; आफ्रिका मीडियाचा मोठा दावा

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांना धक्का

‘मी आरडाओरडा केला आणि काढ ती बंदूक म्हणाले…’; रुपाली ठोंबरेंसोबत घडला भयानक प्रकार

टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! T20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव

प्रेमीयुगुलांसाठी पावसाळ्यात ‘ही’ ठिकाणे आहेत पर्यटनाची बेस्ट ऑप्शन्स!