मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

On: November 23, 2024 7:49 PM
Ram Shinde
---Advertisement---

Vidhan Sabha Election Result 2024 | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार विरूद्ध भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये लढत झाली. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार या मतदारसंघांमध्ये निवडून आले होते. मात्र, यावेळी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता होती. अखेर अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी झाले आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे कर्जत- जामखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर अशी परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपाचे राम शिंदे हे देवेंद्र फडणीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा कर्जत जामखेड मध्ये झाल्या होत्या. यामध्ये कर्जत जामखेडच्या मतदारांना फडणवीस यांनी राम शिंदेंना निवडून आणल्यास त्यांना चांगली जबाबदारी देऊ, असा शब्द दिला होता. मात्र दुसऱ्यांदा रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘या’ कारणांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला!

‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं

लातूर शहरात मोठी उलथापालथ; देशमुख कुटुंबाला मोठा धक्का

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now