Rohit Pawar | शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत.
अजित पवार यांना राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्ह घडयाळ दोन्हीही मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. आता लवकरच लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
महाराष्ट्रात मात्र जागा वाटपावरून महयुतीमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा पक्ष आणि भाजप अशा या तीन पक्षांच्या युतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद होत असल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला कमी जागा देण्यात आल्याची राजकारणात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांची पोस्ट
हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल.
#हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2024
उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागलं तर आश्चर्य वाटू नये. असो स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, ते नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील, अशी पोस्ट करत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा
दरम्यान, हरियाणामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, हरियाणातील भाजपा-जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांचीही आघाडी तुटली आहे. आता खट्टर यांच्या जागी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कुरुक्षेत्राचे खासदार नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री बनवले आहे.
त्यामुळे हरियाणाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय याबाबत आता चर्चा होत आहे. राजकारणात आता खट्टर यांना हटवण्याचं कारण काय, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवरूनच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
News Title : Rohit Pawar targets Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
‘निर्धार महाविजयाचा’; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
“शरद पवारांच्या सल्ल्यानेच भाजपमध्ये…”, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य
‘एका तासाची सोय होईल?’, अभिनेत्री वनिता खरातचा अत्यंत धक्कादायक खुलासा
…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video






