‘रितेश तू माझ्या शरीरातून…’, राखी सावंतचा राग अनावर

On: January 31, 2023 1:47 PM
rakhi sawant
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. नुकतंच राखीच्या आईचं निधन झाल्यानं तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनानंतर तिचे रडतानाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता पुन्हा एकदा राखीचा एक भलताच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये राखी तिच्या हातावरील एक टॅटू रिमूव्ह करताना दिसत आहे.

राखीनं तिच्या हातावर तिच्या पहिल्या पतीच्या नावाचा टॅटू काढला होता. राखीचं लग्न आदिल खानसोबत होण्यापूर्वी तिचा पहिला विवाह रितेश नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता.

याच रितेशच्या नावाचा टॅटू रिमूव्ह करताना राखी या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी म्हणत आहे की, रितेश तू कायमचा माझ्या शरीरातून आणि आयुष्यातून बाहेर गेला आहेस. प्रेमात वेडे होऊ नका, असंही राखी म्हणाली आहे.

दरम्यान, राखीच्या पहिल्या पतीनं नुकताच एका मुलाखतीत दावा केला होता की, राखी सगळं दिखाव्यासाठी करते. तिला सहानुभूती मिळवायला आवडतं. तसेच ती प्रायव्हसी अजिबात पाळत नाही, जे काही असेल ते माध्यमांसमोर बोलून टाकते. ती दुसऱ्यांना कसं वाटंल याचा विचार करत नाही, असंही रितेश म्हणाला होता.

महत्ताच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now