पाणीपुरीवर येणार बंदी; ‘या’ सर्वात मोठ्या आजाराचा धोका

Panipuri Banned l तुम्ही जर गोलगप्पा खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये तेथे विकल्या जाणाऱ्या गोलगप्पामध्ये कॅन्सरसारख्या घातक आजाराला कारणीभूत ठरणारे रसायन सापडले आहे. यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे.

पाणीपुरीवर बंदी येण्याची शक्यता :

यासंदर्भात सरकारने चौकशी देखील सुरू केली आहे. धोका जाणवल्यास गोलगप्पा विकण्यावर आणि खाण्यावर बंदी घातली जाणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने आपल्या तपासणीत 260 ठिकाणांहून गोलगप्पाचे नमुने घेतले होते. त्यापैकी 41 नमुन्यांमध्ये बनावट रंग आणि कर्करोगास कारणीभूत घटक आढळले आहेत.

यामध्ये चमकदार निळा, पिवळा आणि टारट्राझिन ही रसायने सापडली आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, 18 नमुने इतके खराब आढळले की ते वापरासाठी योग्य मानले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

Panipuri Banned l काय म्हणाले कर्नाटकचे आरोग्यमंत्री? :

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश राव गुंडू म्हणाले की, आरोग्य विभाग याप्रकरणी योग्य ती कारवाई करणार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळू दिला जाणार नाही. राव यांनी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमितपणे रस्त्यावरील फेरीवाल्यांची तपासणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. तसेच स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. रंगासाठी रसायनांचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी असे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, गोबी मंचुरियन, कबाब आणि कॉटन कँडीच्या उत्पादनावर कृत्रिम रंगांमुळे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आम्ही त्याची कसून चौकशी करत आहोत. लॅबमधून नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही निश्चितपणे योग्य ती कारवाई करू. तसेच नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि असे पदार्थ खाणे टाळावे.

News Title : Risk Of Cancer! Panipuri Will Be Banned

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता

अखेर करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनबदल केला मोठा खुलासा….

“….तर त्याला जेलमध्ये टाकू”; एकनाथ शिंदेंचा गंभीर इशारा

‘बहिणीनंतर आता मेव्हण्यांसाठी योजना…’; मोठी मागणी समोर

भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाची सर्वात मोठी कारवाई!