लाखाचा खेळाडू करोडोंवर भारी; रिंकू सिंहने मिचेल स्टार्कला दाखवलं आभाळ, पाहा व्हिडीओ

On: March 21, 2024 11:16 AM
Rinku Singh
---Advertisement---

Rinku Singh | आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. सर्व आयपीएल संघ सज्ज झाले आहेत. यंदाच्या आयपीएलने अनेक वळणं घेतली आहेत. त्यानंतर ती आयपीएल येत्या दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहे. पहिला सामना आरसीबी विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. यासामन्याआधी गेम चेंजर रिंकू सिंहने (Rinku Singh) मिचेल स्टार्कला आसमान दाखवलं आहे.

रिंकूने दाखवलं आसमान

रिंकूने मारलेल्या षटकाराची सध्या देशभरामध्ये चर्चा होत आहे. भल्याभल्यांच्या बत्त्या गुल करणारा गोलंदाज मिचेल स्टार्कला रिंकूने आभाळ दाखवलं. रिंकूने मिचेलच्या गोलंदाजीवर अटॅक केला आहे. रिंकूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

इंट्रा स्क्वॉड सराव सामना सुरू होता. त्यावेळी मिचेल स्टार्क हा गोलंदाजी करत होता. त्यावेळी रिंकू सिंह (Rinku Singh) फलंदाजीच्या भोवल्यावर होता. त्यावेळी स्टार्कने रिंकूला चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर रिंकूने (Rinku Singh) आसमान दाखवलं. रिंकूने फूलटॉस चेंडूचा समाचार घेत षटकार ठोकला.

 स्टार्कला 24 कोटी रूपयांना विकत घेतले

दरम्यान, रिंकूने मारलेला चेंडू थेट स्टेडियममध्ये स्क्वेअर लेगला गेला. यंदाच्या आयपीलमध्ये रिंकूला 55 लाख रूपये मोजण्यात आले होते. तर दुसरीकडे स्टार्कला 24 कोटी रूपयांना विकत घेतले. लिलावात झालेल्या खेळाडूच्या किंमतीवर कोणत्याच खेळाडूची कुवत ठरवू नये असं रिंकूने दाखवून दिलं. लखपती रिंकू मिचेल स्टार्कवर भारी पडला.

आयपील 2024 च्या हंगामामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये दुसरा सामना 23 मार्चला होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल फायनल संंघ 2024

नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (कर्णधार), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.

News Title – Rinku Singh Big Hit On Mitchell Starc Bowling

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?

मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!

Join WhatsApp Group

Join Now