Rekha Phad l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. कारण या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे. मात्र वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे.
आम्हाला हलक्यात घेऊ नका :
दरम्यान, आज 22 दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मिक कराडने अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना ओबीसी म्हणून टार्गेट करण्यात आलं आहे.
यासंदर्भात बीडच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस मा.जिल्हाध्यक्ष रेखा फड यांनी “आम्हाला हलक्यात घेऊ नका, शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही भ्याड आहोत” अशा आशयाचं ट्विट केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Rekha Phad l रेखा फड यांचं ट्विट नेमकं काय? :
“आम्हाला हलक्यात घेऊ नका, शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही भ्याड आहोत. राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही. बोटावर मोजण्याइतके आमचे प्रतिनिधी असताना फक्त आमची बोटं छाटण्याचं धोरण राबवणाऱ्या झुंडशहांना आम्ही बळी पडणार नाहीत.. आता ‘ओबीसी’ एकीची झळही सोसावी लागेल.!” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.
आम्हाला हलक्यात घेऊ नका; शांत आहोत याचा अर्थ असा नाही कि आम्ही भ्याड आहोत.!
राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही.. बोटावर मोजण्याइतके आमचे प्रतिनिधी असताना फक्त आमची बोटं छाटण्याचं धोरण राबवणाऱ्या झुंडशहांना आम्ही बळी पडणार नाहीत.. आता 'ओबीसी' एकीची झळही सोसावी लागेल.! pic.twitter.com/8LMce6er6m
— Rekha Phad (@RekhaPhadSpeaks) December 31, 2024
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंना टार्गेट केल्याने रेखा फड या आक्रमक झाल्या आहेत. तसेच त्यांनी ट्विट करत ओबीसी समाजाला टार्गेट करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.
News Title : Rekha Phad Tweet
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजेंनी फडणवीस अन् अजितदादांना केलं टार्गेट!
“तर इतके दिवस…”, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया समोर
बंदोबस्त कमी, शरण येण्याची शक्यता नाही?… तोच पांढऱ्या स्कॉर्पिओतून कराडची एन्ट्री… नेमकं काय घडलं?
सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड कुठे होता? कार्यकर्त्यांनी दिली महत्वाची माहिती
वाल्मिक कराडसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…






