KKR vs RCB l आयपीएल 2025 चा पहिला सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी बंगळुरूने एक विशेष डाव आखला असून, गेल्या वर्षी केकेआरसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या फिल सॉल्टवर RCB ने विश्वास दाखवला आहे. विराट कोहली आणि रजत पाटीदारसोबत सॉल्ट महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केकेआरने गेल्या वर्षी विजेतेपद मिळवले होते, त्यामुळे होम ग्राऊंडवर त्यांचा आत्मविश्वास अधिक असेल. मात्र, RCB चा फिल सॉल्ट, सुयश शर्मा हे माजी KKR खेळाडू आता प्रतिस्पर्धी संघात असल्याने परिस्थिती केकेआरसाठी तितकीशी सोपी राहणार नाही.
दोन्ही संघांचे नवखे कर्णधार, अनुभवाची कसोटी :
यंदाच्या हंगामात दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. केकेआरकडून अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार असून, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदारकडे देण्यात आले आहे. विराट कोहली यंदाही खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. आरसीबीने विराट, पाटीदार आणि यश दयाल यांना रिटेन केले होते, तर इतर खेळाडूंची निवड मेगा ऑक्शनमध्ये झाली.
आरसीबीकडे अनुभवी फलंदाज आहेत, पण फिरकीपटूंचा अभाव त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. दुसरीकडे, केकेआरकडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांसारखे कुशल फिरकीपटू आहेत. तसेच, कोलकाताच्या डावाची सुरुवातही नरेन करू शकतो, हे त्यांच्या रणनीतीचं बलस्थान ठरू शकतं.
KKR vs RCB l कोलकाता विरुद्ध बंगळुरू : संभाव्य संघरचना
RCB संभाव्य संघ:
फिल सॉल्ट (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जॅकब बेथेल, टिम डेविड, कृणाल पांड्या, स्वप्निल सिंह, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार
KKR संभाव्य संघ:
सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, स्पेन्सर जॉनसन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
RCB ने अद्याप एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावलेलं नाही. 17 हंगामांतील ही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी यंदा नव्या खेळाडूंवर विश्वास दाखवत तयारी केली आहे. मात्र यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात RCB विजेतेपद पटकावण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मागील हंगामातील भर काढण्याची संधी RCB ला मिळाली आहे.






