500 ची नोट बंद होणार? एटीएममध्ये वाढल्या 100-200 च्या नोटा! आरबीआयचा ‘हा’ आहे मास्टरप्लॅन

On: June 18, 2025 1:52 PM
ATM Safety Tips
---Advertisement---

RBI | देशातील बहुतांश एटीएममध्ये अलीकडे 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा भरणा वाढत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. याआधी अनेक एटीएममध्ये मुख्यतः 500 रुपयांच्या नोटाच दिल्या जात होत्या, मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे. या बदलामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) मोठा निर्णय आहे. एप्रिल 2025 मध्ये आरबीआयने सर्व बँकांना एटीएममध्ये लहान चलन भरण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत किमान 75 टक्के एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा असणे आवश्यक आहे. यापुढे 31 मार्च 2026 पर्यंत हे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे. यामुळे आता 500 रुपयांच्या नोटांवर बंदी येणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

कॅश व्यवहाराला चालना, पण शुल्कात वाढ :

सीएमएस इन्फो सिस्टिम या देशातील सर्वात मोठ्या रोख व्यवस्थापन कंपनीचे अध्यक्ष अनुश राघवन यांच्या मते, अजूनही देशातील 60 टक्के लोक कॅश व्यवहार करतात. त्यामुळेच लहान चलन उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांना 100-200 रुपयांच्या नोटा वापरणे सोयीचे ठरते.

मात्र दुसरीकडे, एटीएम व्यवहार शुल्कात वाढ झाल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे. 1 मे 2025 पासून, दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्यात 3 वेळा मोफत पैसे काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली असून त्यानंतर प्रत्येक वेळी 19 रुपये शुल्क आकारले जात आहे. बॅलेन्स तपासणीसाठी देखील आता 7 रुपये द्यावे लागतात.

RBI | 500 च्या नोटांवर बंदी? चर्चेला उधाण :

आरबीआयच्या या लहान चलन धोरणानंतर 500 रुपयांच्या नोटा बंद होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही तज्ज्ञ आणि राजकीय नेते जसे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही मोठ्या मूल्याच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की बनावट नोटा आणि मनी लाँडरिंग रोखण्यासाठी 500 च्या नोटा बंद कराव्यात.

या पार्श्वभूमीवर, आरबीआयचा लहान चलन वाढवण्याचा प्लॅन हा 500 रुपयांच्या नोटांची जागा कमी करण्याच्या दृष्टीने पहिला टप्पा असल्याचा कयास काही तज्ञ लावत आहेत. मात्र, यासंदर्भात आरबीआयने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.

News Title: RBI Increases ₹100-₹200 Notes in ATMs: Is India Preparing to Phase Out ₹500 Notes?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now