8 तासांच्या शिफ्टवरून दीपिका व रणवीर या जोडप्यातील मतभेद प्रचंड चर्चेत! नेमकी कोणाची बाजू खरी?

On: December 15, 2025 1:48 PM
Ranveer Singh
---Advertisement---

Ranveer Singh | अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लेक दुआच्या जन्मानंतर तिने कामातून ब्रेक घेतला असून 2025 मध्ये तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मात्र काही कार्यक्रमांमध्ये ती उपस्थित राहिली आहे. यादरम्यान दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. या वक्तव्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली असून त्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दीपिकाच्या (Deepika Padukone) या भूमिकेमुळे तिने ‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि 2898 एडी – पार्ट 2’ हे दोन मोठे प्रोजेक्ट्स सोडल्याची चर्चा होती. या निर्णयावर काहींनी तिच्यावर टीका केली, तर अनेकांनी मातृत्वानंतरची तिची मागणी योग्य असल्याचं म्हणत तिची बाजू उचलून धरली. मात्र या संपूर्ण वादात आता तिचा पती, अभिनेता रणवीर सिंग याचं मत नेमकं काय आहे, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

रणवीर सिंगचं जुनं वक्तव्य व्हायरल :

या सगळ्या घडामोडींमध्ये रणवीर सिंगचा 2022 सालचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर एक्स्ट्रा वर्किंग अवर्स आणि शूटिंगच्या वेळेबद्दल बोलताना दिसतो. त्याचं हे वक्तव्य दीपिकाच्या 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीशी पूर्णपणे विसंगत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणतो, “अनेक लोक मला म्हणतात की तू सगळ्यांना बिघडवतोस. 8 तासांच्या शिफ्टमध्ये तू 10-12 तास शूटिंग करतोस, त्यामुळे आम्हालाही करावं लागतं. पण जर आपल्याला हवं ते काम 8 तासांत पूर्ण होत नसेल, तर थोडं जास्त शूटिंग करणं काही वाईट नाही.” रणवीरच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. (Deepika Padukone 8 Hour Shift)

Ranveer Singh | ‘धुरंधर’साठी 16-18 तास शूटिंगची कबुली :

रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी दिग्दर्शक आदित्य धर यांनी कलाकार आणि संपूर्ण क्रूने प्रचंड मेहनत घेतल्याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं होतं की या चित्रपटासाठी जवळजवळ दीड वर्ष कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी 16 ते 18 तासांपर्यंत शूटिंग केलं.

त्यामुळे रणवीर आणि दीपिका (Deepika Padukone) या दोघांचाही कामाच्या तासांबद्दलचा वेगवेगळा दृष्टिकोन आता चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर काही जण हे नवरा-बायकोतील मतभेद असल्याचं म्हणत आहेत, तर काही जण वैयक्तिक निवडी वेगळ्या असू शकतात, असं मत मांडताना दिसत आहेत.

News Title: Ranveer Singh’s Old Statement on Long Working Hours Sparks Debate Amid Deepika Padukone’s 8-Hour Shift Demand

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now