नारायण राणेंना मोठा धक्का?; केंद्रीय मंत्रिपद जाणार?

On: January 7, 2023 5:46 PM
---Advertisement---

मुंबई | राज्याच्या राजकारणात संजय राऊत (Sanjay Raut) आणि नारायण राणे वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं तर ते चप्पलेनं मारतील, असं वक्तव्य शिवसेना नेते नारायण राणेंनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे संजय राऊत संतापले.

राणे आणि राऊत यांच्यातील हा वाद आता आणखी वाढतच चालला आहे. अशात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल नवीन भाकित वर्तवलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणे राणेंचं केंद्रीय पद जाणार आहे. आताा एक नवीन गट स्थापन झाला आहे. त्यांना सामावून घ्यायचं आहे, यांचा परफॉर्मन्स शुन्य आहे, असं राऊत म्हणालेत.

आताा एक नवीन गट स्थापन झाला आहे. त्यांना सामावून घ्यायचं आहे, यांचा परफॉर्मन्स शुन्य आहे. पीएमओमध्ये आमची सुद्धा माणसं असतात. पण मला त्यात पडायचं नाही. तुम्ही ज्या पक्षात गेला तिथे इमान राखा, आमच्यावर आरोप करू नका, पण निष्ठा बांडगा हा मोठ्या बाग देतो, पण तुम्ही आता मर्यादा सोडली. आम्ही अजून हात सोडले नाही, असं राऊतांनी म्हटलंय.

तुम्ही आमचं काय उखाडणार, तुम्ही आहात कोण, तू काय करणार, लाचार माणूस आहे. 10 पक्ष बदलतो, अशी टीकाही राऊतांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now