Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर महायुतीच्या पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं जात आहे. तसेच अजित पवारांमुळे भाजपला कमी जागा मिळाल्याची चर्चा सुरू आहे. अशात एका नेत्याने महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
रामदास कदम यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात (Shivsena Vardhapan Din) ते बोलत होते. यावेळी त्यांनी. निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन, पण अजितदादा महायुतीत थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं, असं म्हटलं.
रामदास कदमांचा महायुतीला घरचा आहेर
रामदास कदम देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, फडणवीस साहेब अजितदादा (Ajit Pawar) थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असत, असं म्हणत कदमांनी महायुतीच्या अपयशाचं खापर अजित पवारांवरच फोडल्याचं दिसतंय. आता रामदास कदम यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल.
भाजपने त्यांचे उमेदवार 2 महिने आधी घोषित केले, तसे शिवसेनेचे 15 उमेदवार आधी दिले असते तर निवडणुकीचं चित्र वेगळं असतं असं, रामदास कदम यांनी म्हटलंय.
Ajit Pawar | “मला 100 उमेदवार द्या, मी 90 उमेदवार जिंकून दाखवतो”
शिंदेसाहेब, मी हात जोडून तुम्हाला सांगतो त्या भाजपला सांगा, जसे भाजपचे उमेदवार दोन महिने आधी दिले, तसे आमचे 15 उमेदवार पण दोन महिने आधी दिले असते तर आज चित्र वेगळे असते. मला 100 उमेदवार द्या, मी 90 उमेदवार जिंकून दाखवतो, असं रामदास कदम म्हणाले.
आदित्यचे काय योगदान आहे, आमची मंत्रिपदे त्याला दिली. शिवसेनाप्रमुख असायचे तेव्हा मीटिंग व्हायची, नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे. आता हा माणूस एकटाच सगळं बघतो. शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असं त्यांना वाटतं. शिवसेना यांचे गुलाम असल्याचं यांना वाटतंय, असंही त्यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान!
लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही’
महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार






