“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समझने वाले को इशारा काफी”

Ram Satpute | लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत अनेकांनी लक्ष वेधलं होतं. केवळ राज्य नाहीतर देशाचं या निवडणुकीत लक्ष लागलं होतं. अशातच यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि नेते राम सातपुते (Ram Satpute) विरूद्ध काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत झाली. या लढतीत प्रणिती शिंदेंनी विजय मिळवला. अशातच आता पुन्हा एकदा राम सातपुतेंनी (Ram Satpute) प्रणिती शिंदेंच्या विजयावर भाष्य केलं आहे. “हारल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समजने वाले को इशारा काफी”, असं राम सातपुतेंनी (Ram Satpute) प्रणिती शिंदेंचं नाव न घेता टोला लगावला.

“प्रणिती शिंदेंना विजय पचवता आला नाही”

राम सातपुते म्हणाले की, सोलापूरच्या जनतेनं आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं. आम्ही हा पराभव मोठ्या मनाने स्विकारला आहे. जसा पराभव पचवता आला पाहिजे तसाच विजय देखील पचवता आला पाहिजे. प्रणिती शिंदेंना विजय पचवता आला नाही. त्यामुळे त्यांची वाचाळ बडबड सुरू आहे, असं राम सातपुते (Ram Satpute) म्हणाले आहेत.

सोलापूरचा विकास आणि जनतेचे प्रश्न त्या कधीही सोडवणार नाहीत. प्रणिती शिंदे या केवळ स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेशी दिशाभूल करतील. मात्र आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे हे आता सोलापूर पाहतील, असं राम सातपूते म्हणाले आहेत.

दरम्यान राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रणिती शिंदेंनी चंद्रकांत पाटील यांच्या वयाचा विचार करायला हवा असल्याचं राम सातपुते म्हणाले आहेत. त्यामुळे एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहत आहेत. ते येत्या काळात ज्या पद्धतीची भाषा वापरून स्टंटबाजी करत आहेत हे इथली जनता बघत आहेत. त्यामुळे येथील विकास आणि येथील प्रश्न याबाबत खासदार काम करतील का? असा सवाल करत सातपुते यांनी याबाबत शंका उपस्थित केली.

“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये”

त्यानंतर राम सातपुते यांनी चारोळी म्हणत प्रणिती शिंदेंना डिवचलं आहे. हारल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये. समझने वाले को इशारा काफी है!, असं राम सातपुते म्हणाले आहेत. त्यानंतर राम सातुपते यांनी चारोळी म्हणत प्रणिती शिंदेना टोला लगावला आहे. “इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्योंकि तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, अशा शब्दांत राम सातपुते यांनी टोला लगावला आहे.

News Title – Ram Satpute Slam To Praniti Shinde

महत्त्वाच्या बातम्या

सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; LPG सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

‘वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली….’; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनी खळबळ

महादेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

भर कॉन्सर्टमध्ये गायिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार; प्रायव्हेट पार्टबाबत..