बहिणींनो! राखी बांधताना फक्त तीन गाठी मारा, काय आहे यामागचं कारण

On: August 19, 2024 10:39 AM
Raksha Bandhan 2025
---Advertisement---

Rakshabandhan 2024 l ज्या दिवसाची बहीण भाऊ वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस आज उजाडला आहे. भाऊ-बहिणींना समर्पित असलेला रक्षाबंधन हा सण खूप खास आणि महत्त्वाचा आहे. रक्षाबंधनाला बहिणी भावांच्या मनगटावर राखी बांधतात हे सर्वांनाच माहीत आहे, पण राखी बांधताना किती गाठी बांधल्या पाहिजेत हे तुम्हाला माहीत आहे का? व त्या गाठींचा अर्थ काय आहे हे देखील आज आपण जाणून घेऊयात…

राखी बांधायची शुभ वेळ काय आहे? :

रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, यावेळी हा सण आज म्हणजेच सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी दीड ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावाला दुपारी 1 ते 7 या वेळेत कधीही राखी बांधू शकता, पण राखी बांधताना किती गाठी बांधल्या पाहिजेत हे नक्की जाणून घ्या.

Rakshabandhan 2024 l राखी बांधताना किती गाठी बांधाव्यात? :

शास्त्रानुसार, रक्षाबंधन दिवशी राखी बांधताना त्यात तीन गाठी बांधणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक गाठीचे स्वतःचे महत्त्व आहे. धार्मिक आणि सामाजिक मान्यतांनुसार राखी मध्ये तीन गाठी बांधणे खूप शुभ मानले जाते.

या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. राखी बांधताना पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा आणण्यासाठी असते. त्यामुळे राखी बांधताना त्यात तीन गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्या.

News Title – Rakshabandhan Shubh Muhurt 2024

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना रनौतचं महिलांबद्दल खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, “अशा मुली पुरुषांना..”

“एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा”

सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण; अजितदादा नव्हे तर ‘या’ नेत्याला बांधली राखी

आज लाडक्या भावाला राखी नेमकी कधी बांधावी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज रक्षाबंधनाचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, मोठा धनलाभ होणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now