येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस

On: November 9, 2023 1:35 PM
---Advertisement---

मुंबई | ऑक्टोबर हिटनंतर नोव्हेंबर महिन्यातील गुलाबी थंडी सुरु झाली होती. मात्र दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. तसेच हवामान विभागाने (Weather Department) येत्या 24 तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे .

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली होती. त्यानुसार राज्यात बुधवारीसुद्धा अनेक भागांत पाऊस झाला. आता गुरुवारी पाऊस होणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट तर येत्या 24 तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातही काही ठिकाणी पाऊसाला सुरूवात झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना या अचानक आलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईत हवामान विभागाने (IMD)  येलो अलर्ट जारी केला आहे.

9 नोव्हेंबर, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार दक्षिण #कोकण भागांसह दक्षिण #मध्यमहाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासांत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 2,3 दिवस या भागात अंशत: ढगाळ आकाश कायम राहील, असं हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं 

पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now