मुंबईत मान्सूनचं जोरदार आगमन, ‘या’ भागांना येलो अलर्ट

On: June 10, 2024 4:42 PM
Rain Update
---Advertisement---

Rain Update | राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईमध्ये पाऊस पडत आहे. पावसाची सुरूवात जोरदार झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. पुण्यात तर पुरजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईत 10 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई, पालघरला येलो अलर्ट तर ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला. सिंधुदुर्ग, कोल्हापूरला रेड अलर्ट दिला. (Rain Update)

मुंबईत पावसाची हजेरी

मुंबई शहरामध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. नालासोपाऱ्याच्या महापालिकेच्या विजेच्या खांब्याला शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहन कासारकर असं त्या युवकाचं नाव आहे. त्याचं वय हे 29 आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले दिसून आले. (Rain Update)

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने अनेक अपघात होताना दिसत आहेत. पावसाच्या पाण्यातून मार्ग काढत लोकं जात असतात. यावेळी नालासोपाऱ्यात ही घटना घडली आहे. यामुळे आता महापालिकेचा निष्काळजीपणा समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. (Rain Update)

मुंबईत सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मध्यरात्री देखील रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दादरमधील हिंदमाता परिसरात पावसामुळे पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने काही गाड्या बंद पडल्या आहेत. अर्थातच वाहतुकीसाठी खोळंबा केला. (Rain Update)

नाशिकमध्ये पावसाने लावली हजेरी

नाशिक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं दिसून आलं आहे. नाशिक शहरासह परिसरात रात्री दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील वडाळा परिसरात भिंत कोसळून चार ते पाचजणं जखमी झाल्याचं दिसून आलंय नाशिकच्या मनमाड परिसरात पावसाने धुवांदर बॅटिंग केली. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसाने शहरात पाणी साचलं आहे.

News Title – Rain Update Heavy Rain Warning At Mumbai, Raigad For yellow Alert

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; शरद पवार सरप्राईज देणार?

नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ; जाणून घ्या एका क्लिकवर

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्वाचा इशारा

नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच झाला दहशतवादी हल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्याने साधला निशाणा

या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा

Join WhatsApp Group

Join Now