राज्यातील ‘या’ भागांना हवामान खात्याचा अत्यंत महत्वाचा इशारा!

Rain Update | मान्सून राज्यभरात पोहोचला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्वाधिक रायगड, मुंबई तसेच ठाणे येथे पावसाने धुमशान मचावलं आहे. आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Update)

‘या’ भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गासह सातारा, मुंबई आणि पालघर येथे पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. (Rain Update)

आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामं उरकली आहेत. राज्यात 30 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघर येथे पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. आज विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागील वर्षाच्या मान्सूनपेक्षा यंदाच्या वर्षी मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झाला. मात्र राज्यामध्ये तो सध्या विविध भागात दाखल होत आहे, (Rain Update)

पावसाने जोर लावला तर पाणीटंचाई होणार नाही

मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं. म्हणून राज्याच्या मुंबई आणि ठाणे तसेच पुणे सारख्या शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने यंदा जोराचा पाऊस होणार असल्याचा  अंदाज दिला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी पाऊस झाला तर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

News Title – Rain Update Heavy Rain In Maharashtra yellow Alert

महत्त्वाच्या बातम्या

बीड कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘या’ आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी!

“डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन”; लंके समर्थकांनी बॅनरद्वारे विखे पाटलांना डिवचलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार घडवणार देवदर्शन, एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

‘या’ दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल केली धक्कादायक भविष्यवाणी!

शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट