Rain Update | राज्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. सध्या कोकणभागात, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच हा पाऊस आता राज्यात पोहोचू लागला आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील पावणारी तेरणा नदी वाहू लागली आहे. (Rain Update)
राज्यात पावसाने लावली हजेरी
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने माजलगावच्या कोथळा गावात नदीला पूर आला. यामुळे आता दोन गावचा संपर्क तुटला गेल्याचं दिसून आलं. खरीप हंगामाची सुरूवात होताच पावसाला सुरूवात झाल्याने बळीराजा तुर्तास सुखावला आहे. (Rain Update)
धारधीव जिल्ह्यातील उगम पावणारी तेरणा नदी वाहू लागली.. मदनसूरी बॅरेज चे दरवाजे उघडले @Hosalikar_KS pic.twitter.com/1X7ZS8SZBF
— Siddhanath mane (@mane_sakal) June 11, 2024
लातूर जिल्ह्यात ढगफूटी
दरम्यान, लातूर जिल्ह्यामध्ये ढगफूटी झाली असल्याचं दिसून आलं आहे. नेलवाडा गावातील शेती आणि रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं आहे. गावातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने गावकऱ्यांना बाहेर पडण्यास अडचण झाली आहे. शेतीमध्ये पाणी घुसल्याने माती वाहून गेली आहे. ओढ्यांना पूर अल्याने शेती रस्ते ठप्प झाल्याचं दिसून आलं आहे. (Rain Update)
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रतिक्षेत मोठ्या प्रमाणात पावसाने (Rain Update) दमदार हजेरी लावली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक भागामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली असल्याचं दिसून आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह खामगाव, नांदुरा, शेगांव, परिसरात पाऊस धो धो स्वरूपात पाऊस झाला. रस्त्यावर पाणी साचलं आहे.
उमरगा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस@Hosalikar_KS pic.twitter.com/qw86tUfpC2
— Siddhanath mane (@mane_sakal) June 10, 2024
मुसळधार पावसाने संभाजीनगरमध्ये आगमन झाले आहे. संभाजीनगरमध्ये रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री 58.8 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली.
नांदेड, बीड,जालना, परभणी, लातूर, धाराशिव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
News Title – Rain Update Heavy Rain In Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक, उपोषण थांबवण्यासाठी शरद पवारांचं मोठं पाऊल
‘मिर्झापूर 3’ वेबसिरीज संदर्भात मोठी अपडेट समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीज
‘थोडं थांबा…’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना गंभीर इशारा
“लोकसभेत सर्वात जास्त मेहनत घेऊन उद्धव ठाकरेंना काय मिळालं?”
“गोड बोलून माझा काटा काढण्याचा..”; मनोज जरांगेंचा अत्यंत गंभीर आरोप






