Raigad News | राज्याचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे सुपुत्र विकास गोगावले (Vikas Gogawale) यांच्यापुढील कायदेशीर पेच अधिक कठीण झाला आहे. महाड (Mahad) नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. वारंवार जामीन अर्ज फेटाळले गेल्यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तीनवेळा जामीन अर्ज फेटाळली
युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य असलेल्या विकास गोगावले यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर लढा दिला, मात्र त्यांना यश आले नाही. माणगाव (Mangaon) (Raigad News) न्यायालयाने दोन वेळा त्यांचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. दुर्दैवाने उच्च न्यायालयानेही त्यांना कोणताही दिलासा न दिल्याने शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) युवा नेत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.
निवडणूक काळातील प्रभागातील तणाव आणि त्यानंतर उद्भवलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे हा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याच्या मुलाचा अर्ज वारंवार नामंजूर होणे, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी विकास गोगावले यांना केव्हा ताब्यात घेणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
Raigad | महाडमधील राजकीय राडा
नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) अजित पवार गटाच्या समर्थकांमध्ये भीषण चकमक झाली होती. या वादात केवळ शाब्दिक चकमकच नाही, तर वाहनांची तोडफोड आणि शस्त्रांचा वापर झाल्याचेही समोर आले होते. या हाणामारीनंतर दोन्ही बाजूंनी महाड पोलीस ठाण्यात (Mahad Police Station) परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
केवळ सत्ताधारी गटाचेच नाही, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही अटकेची टांगती तलवार आहे. माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे बंधू हणमंत जगताप (Hanmant Jagtap) आणि सुशांत जाबरे (Sushant Jabre) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे जामीन अर्ज फेटाळले गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे महाडमधील(Raigad News) वातावरण पुन्हा एकदा संवेदनशील बनले असून राजकीय संघर्षाची धार तीव्र झाली आहे.





