राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

Rahul Gandhi | नुकतंच देशाचं सरकार स्थापन होऊन काही दिवस झाले आहेत. काही दिवसांआधी खासदारांनी संसदेत शपथ घेत आपला कारभार स्विकारला आहे. अशातच लोकसभा अध्यक्षपदाची देखील निवडणूक झाली. तेव्हा ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून राहुल गांधींना निवडण्यात आलं. दरम्यान आता अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भगवान शंकराचा फोटो संसदेच्या भरसभेत दाखवला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केलेल्या या कृत्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

संसदेत राहुल गांधींच्या हातात महादेवाचा फोटो :

संसदेच्या भरसभेत राहुल गांधी यांनी भगवान महादेवाचा फोटो दाखवला. यामागचं कारण समोर आलं आहे. त्यांनी हातात महादेवाचा फोटो पकडत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “सत्य, अहिंसा आणि धाडस हेच आमचं हत्यार आहे. शिवशंकराचे त्रिशूळ हे आमच्या अहिंसेचे त्रिशूळ आहे. हेच आमचं अहिंसेचं प्रतीक आहे,” असं राहुल गांधी (Rahul Gandhi) संसदेत म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भगवान शंकराची मूर्ती दाखवली आहे. त्याच्या या कृतीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप नोंदवला आहे. नियमांनुसार हे योग्य नाही, असं ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले आहेत. त्यानंतर राहुल गांधींनी फोटोच्या माध्यमातून काही सांगू इच्छित असल्याचं सांगितलं आहे. शिवशंकरापासून आपल्याला निर्भय राहण्याची संधी मिळते. भगवान शंकरापासून आपल्याला कधीही सत्यापासून मागे हटू नये, अशी प्रेरणा मिळते. त्रिशूळ हे अहिंसेचं प्रतीक आहे. ते जेव्हा उजव्या हातात येत तेव्हा ते हिंसेचं प्रतीक होतं. सत्य, धाडस आणि अहिंसा हेच आमचं संबंळ असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी – अमित शहा

यावेळी भगवान शंकराच्या फोटोनंतर राहुल गांधींनी गुरूनानक यांचा फोटो दाखवला. ते म्हणाले की, शिवशंकर म्हणतात, घाबरू नका आणि घाबरवू नका. जे लोकं स्वत:ला हिंदू मानतात आणि 24 तास हिंसा करतात ते हिंदू कसे होतील. त्यावर आता राहुल गांधींनी त्यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेप घेतला आहे.

राहुल गांधी बोलत असताना नरेंद्र मोदी अचानक उभे राहिले आणि त्यांना राहुल गांधीच्या भाषणावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, हिंदूंना हिंसक समाज म्हणणं चुकीचं आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींनी धर्मावरील केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी अमित शहा यांनी केलीय.

राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागावी. हिंसेला धर्मासोबत जोडणं हे चुकीचं आहे. राहुल गांधींनी पूर्ण देशाची माफी मागावी, असं अमित शहा म्हणाले आहेत. यावेळी ओम बिर्ला यांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधींना सुनावलं आहे. विरोधी पक्ष नेत्यानं गरिमा ठेवली पाहिजे, असं ओम बिर्ला म्हणाले आहेत.

News Title – Rahul Gandhi Show Lord Mahadev Photo In Sansad Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेत राडा; दानवेंनी प्रसाद लाडांना दिली शिवी, म्हणाले ‘ए मा****’

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट

मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी

‘या’ भागात पावसाने घातलं थैमान, रस्त्यावर अचानक मगरी आल्याने भीतीचं वातावरण

राहुल गांधींचं हिंदुंबाबत धक्कादायक वक्तव्य; पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल