Raha Kapoor | बाॅलिवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्याकडे पाहिलं जातं. रणबीर आणि आलिया अनेक कार्यक्रमात एकत्र दिसत असतात. हे दोघे कायम आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर रणबीर आलिया यांची गोंडस लेक राहा देखील पापाराझीमुळे चर्चेचा विषय ठरत असते. सोशल मीडियावर राहाच्या फोटोवर अनेक नेटकरी कमेंट्स करत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर राहा आणि तिची आजी या दोघांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
कायम पापारीझी समोर राहा (Raha Kapoor) आपल्या क्यूटनेसमुळे कॅमेऱ्यात कैद होत असताना दिसते. राहाचा गोंडसपणा हा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. मात्र, सध्या राहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहा तिच्या आजीसोबत गाडीमध्ये बसून जात असल्याचं समोर आलं. जेव्हा गाडीतून फिरत असताना राहा खिडकीतून बाहेर डोकावून पाहाते तेव्हा तिची आजी तिला आत ओढते आणि काच वर करते. त्यामुळे राहाच्या आजीला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.

नक्की काय घडलं?
राहा (Raha Kapoor) तिच्या आजीसोबत म्हणजेच सोनी राजदान यांच्यासोबत मुंबईमध्ये गाडी फिरत होती. या वेळी एका ठिकाणी त्यांची कार थांबली होती. तेव्हा राहा कारच्या खिडकीतून बाहेर डोकावून कुतूहलाने इकडे-तिकडे बघत असताना पापाराझीने राहाला पहायला आणि त्यांनी राहाला हाक मारत व्हिडीओ शूट करु लागले. हे पाहताच सोनी राजदान पटकन राहाला खाली बसवलं आणि राहाची पाठ फिरवली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसला.
View this post on Instagram
सोनी राजदान ट्रोल-
हा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी सोनी राजदान यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांची तुलना थेट जया बच्चन यांच्या सोबत करण्यात आली. ‘राहाची (Raha Kapoor) आजी पापाराझींसोबत नीट वागत नाही’, तर ‘आता ती लहान मुलगी मोकळ्या हवेत श्वाससुद्धा घेऊ शकत नाही का’, अशाा प्रकारचे कमेंट्स नेटकरी करत आहे. सोनी राजदान यांचा राग पाहून एका युजरने लिहिलं, ‘ही तर दुसरी जया बच्चन.’
News Title : raha kapoor video goes viral
महत्त्वाच्या बातम्या-
मराठा आंदोलनाला मोठा धक्का! अचानक प्रकृती खालावली, जरांगे पाटलांचा धक्कादायक फोटो
दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; विनाशुल्क भरता येणार अर्ज
विजय कदम यांच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होतं मोठं कनेक्शन!
“अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत”; राज ठाकरेंचं वक्तव्य
“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा






