पुण्यात आढळले झिकाचे 7 रुग्ण; काय आहेत लक्षणं

Pune Zika Virus l गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात झिकाचे रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच आता दिवसेंदिवस पुण्यात झिका व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत? :

पुण्यातील एरंडवणे येथील दोन गर्भवतींना आणि कोथरूडच्या एका नागरिकाला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पुणे महापालिकेकडून अति दक्षता म्हणून प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी दिली आहे.

– ताप
– सांधेदुखी
– डोकेदुखी
– डोळे लाल होणे
– अंगदुखी
– उलटी होणे
– अंगावर पुरळ उठणे
– अस्वस्थता जाणवणे

Pune Zika Virus l पुण्यात झिकाचे आढळले 7 रुग्ण :

पुण्यात झिकाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला आहे याचे धागेदोरे आरोग्य यंत्रणेला सापडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये 46 वर्षांचा डॉक्टर आणि त्याच्या 15 वर्षांच्या मुलीला झिकाचं निदान झालं असल्याचं दिसून आलं आहे.

त्यानंतर पुण्यातील मुंढवा येथे 47 वर्षांची एक महिला आणि तिच्या 22 वर्षांच्या मुलाला देखील झिकाचं निदान झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. हा आजार डासांपासून पसरत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आषाढी वारीच्या तोंडावर झिकाचे 7 रुग्ण आढळल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

News Title : Pune Zika Virus Community Spread

महत्त्वाच्या बातम्या-

चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?

तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं आहे का? हे तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या एका क्लिकवर

पाणीपुरीवर येणार बंदी; ‘या’ सर्वात मोठ्या आजाराचा धोका

सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता