पुण्यातील महिलेला कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये; प्रामाणिक मावशीच्या कृतीला ‘सलाम!’

On: November 22, 2025 3:52 PM
cash found in trash Pune
---Advertisement---

Pune News | आजच्या काळात प्रत्येकजण पैशासाठी धडपड करताना दिसतो. काही जण पैशासाठी चुकीचे मार्गही निवडतात. पण पुण्यातील एका साध्या कचरावेचक महिलेनं आपल्या वागणुकीतून प्रामाणिकपणाचं उदाहरण घालून दिलं आहे. सदाशिव पेठेत कचऱ्यातून तब्बल दहा लाख रुपये सापडल्यावर तिने जे केलं ते ऐकून तुम्हीही कौतुक कराल. (cash found in trash Pune)

सदाशिव पेठेत स्वच्छ संस्थेतर्फे कचरा गोळा करणाऱ्या अंजू माने या गेल्या २० वर्षांपासून या भागात काम करत आहेत. रोजच्या प्रमाणे त्या सकाळी सातच्या सुमारास कचरा गोळा करत होत्या. संकलन केंद्राजवळ कचऱ्यात एक मोठी पिशवी आढळली. सुरुवातीला त्यात औषधे असतील असा त्यांचा अंदाज होता. पण जेव्हा ती पिशवी उघडण्यात आली तेव्हा आत दहा लाखांची रोख रक्कम असल्याचे पाहून त्या थक्क झाल्या.

पुण्यातील महिलेनं निवडली प्रामाणिकतेची वाट :

एवढ्या मोठ्या रकमेसह औषधांचं पाकीट कोणाचं तरी खूप महत्त्वाचं असणार, असा विचार करून अंजू माने यांनी पिशवी लपवण्याऐवजी तिचा मालक शोधण्यास सुरुवात केली. परिसरातील नागरिक, दुकानदार आणि ओळखीतील लोकांशी संपर्क साधून त्यांनी हरवलेली व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने एक व्यक्ती त्या भागात अतिशय चिंतेत काहीतरी शोधताना दिसली.

त्या व्यक्तीला पाणी देऊन शांत केल्यानंतर पिशवीतील औषधे आणि माहितीच्या आधारे तीच व्यक्ती मालक असल्याचे स्पष्ट झाले. आणि लोकांच्या उपस्थितीत दहा लाख रुपयांची ती पिशवी त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

Pune News | समाजासाठी प्रेरणा; पुणेकरांनी केला सत्कार :

पैसा हातात असूनही मोहाला बळी न पडता प्रामाणिकपणे ते पैसे परत करणाऱ्या अंजूताईंच्या या कृत्यामुळे परिसरातील लोकांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. साडी आणि काही रोख रक्कम देत त्यांच्या घरी जाऊन अनेकांनी आदर व्यक्त केला. (cash found in trash Pune)

मानवता आणि प्रामाणिकता अजूनही जिवंत असल्याचे या घटनेनं स्पष्ट केलं असून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.

News Title: Pune Woman Finds ₹10 Lakh in Garbage and Returns It — A Heartwarming Story of Honesty

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now