पुण्यात पुरणपोळीवरुन झाली जोरदार हाणामारी, नेमका काय घडला प्रकार?

On: February 16, 2025 2:29 PM
Pune Crime
---Advertisement---

Pune Crime l पुणे (Pune) शहरातील वाघोली (Wagholi) येथे एका हॉटेलमध्ये पुरणपोळीत पुरण कमी असल्याच्या कारणावरून ग्राहकाने वाद घालत हॉटेल चालक आणि त्याच्या बहिणीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी घडला. या प्रकरणी ३९ वर्षीय तरुणाने तक्रार दिली असून, पोलिसांनी खलील अन्सारी (Khalil Ansari) (वय ३०, रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले? :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे वाघोली परिसरात हॉटेल आहे, तर आरोपीची त्याच परिसरात जिम (Gym) आहे. ११ फेब्रुवारीला आरोपी आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये जेवायला आले होते. जेवताना त्यांनी पुरणपोळीत पुरण कमी असल्याचा आरोप करत तक्रारदाराशी वाद घातला.

वाद वाढल्यानंतर आरोपीने तक्रारदाराला शिवीगाळ केली आणि हाताने तसेच खुर्चीने मारहाण केली. यात तक्रारदाराला दुखापत झाली. तक्रारदाराची बहीण भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता, आरोपीने तिलाही हाताने मारहाण केली. तसेच, आरोपीने दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी आणि त्याच्यासोबतची व्यक्ती बिल न देता हॉटेलमधून निघून गेले.

News title : Pune Wagholi Hotel Owner Beaten for Less Puran in Puranpoli

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now