Pune Nagpur Railway | नवीन वर्ष २०२६च्या स्वागतासाठी देशभरात तयारी सुरू असून, याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला सुट्ट्या, पर्यटन आणि कौटुंबिक प्रवासामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढते. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-नागपूर मार्गावर 3 विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष गाड्यांमुळे पुणे, हडपसर आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन वर्षाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार विशेष गाड्या? :
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाकडून खालील तीन विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येणार आहेत –
हडपसर – नागपूर विशेष एक्सप्रेस
पुणे – नागपूर विशेष एक्सप्रेस
हडपसर – राणी कमलापती (भोपाळ) विशेष एक्सप्रेस
Pune Nagpur Railway | या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे पुढीलप्रमाणे :
हडपसर – नागपूर विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक
ही विशेष गाडी 28 व 30 डिसेंबर 2025 तसेच 1 व 4 जानेवारी 2026 रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून पहाटे 03:50 वाजता सुटेल आणि सकाळी 06:30 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी 26, 29, 31 डिसेंबर 2025 तसेच 2 जानेवारी 2026 रोजी नागपूरहून धावणार आहे.
या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
पुणे – नागपूर विशेष एक्सप्रेस :
ही विशेष एक्सप्रेस 27, 29, 31 डिसेंबर 2025 आणि 3 जानेवारी 2026 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 08:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 02:05 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
परतीच्या मार्गावर ही गाडी 28, 30 डिसेंबर 2025 तसेच 1 व 4 जानेवारी 2026 रोजी नागपूरहून दुपारी 04:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45 च्या सुमारास पुणे येथे पोहोचेल.
या गाडीचे थांबे हडपसर – नागपूर विशेष गाडीप्रमाणेच असणार आहेत.
हडपसर – राणी कमलापती (भोपाळ) विशेष एक्सप्रेस :
हडपसर ते राणी कमलापती (भोपाळ) दरम्यानची विशेष गाडी 28 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत चालवण्यात येणार आहे. ही गाडी प्रत्येक रविवारी धावणार आहे.
हडपसरहून ही गाडी रविवारी सकाळी 07:50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी शनिवारी सकाळी 08:40 वाजता राणी कमलापतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हडपसरला पोहोचेल.






