पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास सुपरफास्ट, ग्रीनफिल्ड महामार्गाचं काम सुरु होणार

On: February 16, 2025 2:40 PM
Latur–Kalyan Highway
---Advertisement---

Greenfield Highway l पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) जोडणारा ग्रीनफिल्ड महामार्ग (Greenfield Highway) होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) (MSRDC) या मार्गातील पुणे ते शिरूर या ५३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे काम करणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल.

पुणे-शिरूर उन्नत मार्गासाठी निविदा :

पुणे ते शिरूर या ५३ किमीच्या रस्त्यावर उन्नत मार्ग बांधण्यासाठी सुमारे ६,१२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग डिझाइन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीएफबीओटी) या मॉडेलवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारला जाईल. एमएसआयडीसीने (MSRDC) यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. पुणे ते शिरूर प्रकल्पामुळे पुण्यातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.

एमएसआयडीसीने (MSRDC) निविदा सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने पुणे ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) एनएच ७५३ एफ महामार्गाचा सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, पुणे ते शिरूर असा ५३ किमी लांबीचा उन्नत मार्ग आणि पुढे अहमदनगर ते देवगड रस्त्याची सुधारणा केली जाईल. हे काम एमएसआयडीसीकडून (MSRDC) केले जाईल. अहमदनगर ते देवगड या मार्गात सुधारणा करण्यासाठी ४१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Greenfield Highway l संपूर्ण महामार्ग २५० किलोमीटरचा :

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असा नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याचाही एमएसआयडीसीचा (MSRDC) प्रस्ताव आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) हा संपूर्ण महामार्ग २५० किमीचा असेल.
यामध्ये पुणे ते शिरूर हा सध्याच्या रस्त्यावर उन्नत मार्ग असेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची जोडणी शेंद्रा एमआयडीसी भागात समृद्धी महामार्गाला (Samruddhi Highway) दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

News title : Pune- Sambhajinagar Greenfield Highway Project Update

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now