Pune News l सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केले आहेत. यानुसार आज पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी :
भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात आज म्हणजेच 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी आणि भोर तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
पुण्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेनुयात आला आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम देखील थेट शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता वर नमूद केलेल्या तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टीराहणार आहे.
Pune News l राज्यातील काही भागांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी :
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहावे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावं असं देखील आदेशात नमूद करण्यात आल आहे.
हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
News Title – Pune Rain Red Alert Schools Remain Closed Tuesday
महत्वाच्या बातम्या-
आजपासून ‘या’ राशीधारकांचा सुवर्णकाळ सुरु; नशीब चमकणार
‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात सुख-समृद्धी चालून येईल
“खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत?”;जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता
कोट्यावधींचे 24 भव्य आश्रम, महागड्या गाड्या; भोलेबाबाची एकूण संपत्ती किती?






