Pune Porsche Accident | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचं संपूर्ण कुटुंबच आता गोत्यात सापडलं आहे. अगोदर आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन सापडले होते. आता थेट छोटा राजनशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचीही पुणे पोलिसांकडून चौकशी केली जातेय.
पोलिसांनी आता वेदांतच्या आजोबांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.पोलिसांकडून आजोबांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची कसून चौकशी करत आहेत. आता यातून काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल.
या प्रकरणी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. काल विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तर, आता वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशीनंतर सुटका होणार की अटक?, ते पाहावं लागेल.
सुरेंद्र अग्रवाल या प्रकरणात कसे आले?
काही मीडिया रिपोर्टनुसार सुरेंद्र अग्रवाल यांचा त्यांच्या भावाशी संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनी 2007 आणि 2008मध्ये बँकॉकला जाऊन छोटा राजनची भेट घेतल्याची माहिती आहे. यानंतर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारीही छोटा राजनला दिली होती. या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल आहे. त्यावेळी पुणे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
कारण, अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरणामध्ये पोलिस हे मकोकाच्या अंतर्गत एफआयआर दाखल करत असतात. मात्र, यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आयपीसीच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवला होता. सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना अटकही केली नव्हती. छोटा राजनला अटक केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी पुन्हा एकदा सुरेंद्र अग्रवाल (Pune Porsche Accident ) यांची चौकशी सुरू केली आहे.
पुणे अपघात प्रकरण काय?
पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने कारने दारूच्या नशेत दोघांना चिरडलं. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याला कोर्टाने 15 तासांच्या आत 300 शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देखील दिला. यामुळे राजकारण पेटलं आहे. या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली असून सध्या ते पोलिस कोठडीमध्ये आहेत. आता विशाल अग्रवाल यांचे वडील (Pune Porsche Accident ) तथा वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल चर्चेत आले आहेत.
News Title – Pune Porsche Accident Investigation of Surendra Agarwal
महत्त्वाच्या बातम्या-
“स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे 2014 नंतर गायबच झाले”
‘गाडी देऊन चूक केली’; मुलाने दोघांचा जीव घेतल्यानंतर विशाल अग्रवालला खंत
पुण्यासारखंच जळगावमध्ये मर्सिडीजनं चौघांना चिरडलं, राजकारण्याचा मुलगा मोकाट?
“लग्नापूर्वी वर्षभर..”, आमिर खानच्या एक्स पत्नीचा धक्कादायक खुलासा






