पुणे हादरलं! सासवडमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ

On: July 18, 2024 6:37 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोर्शेकार आपघातानंतर पुण्यात ड्रग्ज प्रकरण समोर आलं. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत असताना आता भरदिवसा गोळीबार देखील होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सासवडमध्ये गोळीबार

पुण्यातील (Pune News) सासवडमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. सासवडमधील एका दुकानात शिरुन अज्ञातांनी गोळीबार केला आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरु केला आहे. मात्र, गोळीबार का केला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

गुन्हेगारीत वाढ-

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण होत असताना पहायला मिळत आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर एका आमदाराच्या पुतण्याने देखील दोघांना उडवले होते. शिवाय पुण्यातील कायम गजबलेल्या परिसरात ड्रग्ज सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या गोष्टी घडत असताना सरकारचं पुण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं जात आहे.

News Title – Pune news young shot by gun

महत्त्वाच्या बातम्या-

“अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?”; योजनेसाठी काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार

उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात! 10 ते 12 डब्बे रुळावरून घसरले, मृतांचा आकडा समोर

महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer

कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now