Pune News | पुणे (Pune) शहरात आयोजित मॅरेथॉनमुळे रविवारी (दि. १६) बाणेर आणि चतुःशृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende) यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune News)
बाणेर परिसरातील वाहतूक बदल
राधा चौकाकडून सायकर चौकाकडे जाणारी वाहतूक पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांनी लक्ष्मी माता मंदिर, गणेश मंदिर चौक, ज्युपिटर हॉस्पिटल चौक, ताम्हाणे चौक, आणि नागरस रोडचा वापर करावा.
सायकर चौकाकडून राधा चौकाकडे जाणारा मार्ग देखील दुतर्फा वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल.
चतुःशृंगी परिसरातील वाहतूक बदल
भाले चौक ते वेस्टएन्ड मॉल रोड चौक – परिहार चौक – ब्रेमेन चौकापर्यंत वाहतूक रस्त्याच्या उजव्या बाजूने दुतर्फा चालू राहील. महामॅरेथॉनसाठी रस्त्याची डावी बाजू वापरण्यात येणार आहे.
ब्रेमेन चौक ते बालकल्याण संस्थेपर्यंत, स्पर्धक रस्त्याच्या उजव्या बाजूने फुटपाथ लगत धावतील आणि त्याच मार्गाने बालेवाडी क्रीडा संकुल येथे परत जातील. (Pune News)
News Title : Pune News Traffic Diversions in Pune on Sunday for Marathon






