जिल्हाधिकारी कार्यालयातले हेलपाटे वाचणार, तालुका स्तरावर सुटणार समस्या

On: February 17, 2025 10:27 AM
Pune News Taluka Level Grievance Redressal  Lokshahi Din on Third Monday
---Advertisement---

Pune News | गाव आणि तालुका पातळीवर नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे आता थांबणार आहेत, कारण तालुका पातळीवर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे (Lokshahi Din) आयोजन केले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह इतर अधिकारी उपस्थित राहून समस्या सोडवणार आहेत. तसेच, नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांचे प्रश्न एका महिन्याच्या आत निकाली काढण्यात येणार आहेत. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. (Pune News)

लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार

राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी हा लोकशाही दिन (Lokshahi Din) आयोजित केला जातो. मात्र, तक्रारी वेळेत न सुटल्याने जिल्ह्यातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) येतात, तसेच इतर संबंधित जिल्ह्याच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत असतात. तक्रार न सुटण्याचे प्रमाण वाढल्याने, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Collector Office) चकरा वाढल्या आहेत. त्यामुळेच, तालुका पातळीवरच नागरिकांचे प्रश्न सुटले, तर त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) किंवा जिल्ह्याच्या इतर कार्यालयांमध्ये येण्याची गरज पडणार नाही.

लोकशाही दिनाच्या (Lokshahi Din) कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असतील, तर तहसीलदार हे सचिव असणार आहेत. तसेच, गटविकास अधिकारी (बीडीओ) (BDO) हे सहसचिव असणार आहेत. त्यामुळे हे तीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून तक्रारींची दखल घेतील.

२६ अतिक्रमणे काढली

जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात किंवा अन्य ठिकाणी दौरे करावेत, अशा सूचना डुडी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर दौरे सुरू केले आहेत. तसेच, त्याचा आढावा स्वतः जिल्हाधिकारी घेत आहेत. एका उपविभागीय अधिकाऱ्यांनी एका दिवसात २६ ठिकाणची अतिक्रमणे काढल्याने रस्ता मोकळा झाल्याचे निरीक्षण नोंदवले. तर, काही अधिकाऱ्यांनी अंगणवाडी, पंचायत समिती, शाळांना भेट देऊन ‘मिड डे मील’ ची पाहणी केल्याचे निरीक्षण नोंदवले. (Pune News)

News Title : Pune News Taluka Level Grievance Redressal  Lokshahi Din on Third Monday

 

Join WhatsApp Group

Join Now