पुण्यात ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

On: June 24, 2024 1:08 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणे ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे शहरात कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताचं प्रकरण ताजं असताना. आता पुणे शहरातील (Pune News) एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील (Pune News) शिवाजीनगर येथील एफसी रोड येथे एका हॉटेलमध्ये काल मध्यरात्री अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावर आता रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. अंमली पदार्थ सऱ्हासपणे हजारो हॉटेलमध्ये मिळत आहे. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात असे प्रचंड अंमली पदार्थ मिळतात. यामध्ये पोलिसांची चूकच आहे. याकडे दुर्लक्ष करतात. हाप्ता बंद झाला. पैसे घेतनेल्या असे धंदे चालतात. उत्पादन शुल्क मंत्री हे रजपूत सारख्याला पाठिशी घालून, ज्यांच्याकडून कोट्यवधी रूपये शंभूराज देसाई घेतात, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

आम्ही एवढं आंदोलन करूनही संबंधित अधिकाऱ्याची बदली झालेली नाही. याचा अर्थ शंभूराज देसाई हे अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात. हे खोके सरकार पाठिशी घालतात. हा पैसा राजकारणात वापरण्यासाठी तरूणाईला बरबाद करण्याचं काम लोकं करत असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. (Pune News)

मी तुम्हाला यादी देऊ शकतो की कोणत्या हॉटेलमधून किती हाफ्ता मिळतो. माझ्याकडे याची यादी आहे. माझ्याकडे ही यादी रात्रीच आली आहे. यादीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैशाच्या स्वरूपात हाप्ता पोलिसांना मिळतो. त्यांच्याच पुण्याईने अंमली पदार्थी विकले जातात, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.  (Pune News)

“पुण्याचं नाव बरबाद केलं”

ज्या ठिकाणी हे सर्व चालू आहे. त्या हॉटेलला सेल लावलं पाहिजे आणि हॉटेल बंद केलं पाहिजे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. आता हॉटेल चालकांना भीती राहिली नाही. अजूनही पहाटे चार वाजेपर्यंत बार सुरू असतात. अजूनही किड संपलेली नाही. अजूनही पैसे आणि हाप्ता याच्यामुळे पुण्याचं नाव या मंडळींनी बरबाद केलं असल्याचं धंगेकर म्हणाले आहेत.

News Title – Pune News Ravindra Dhangekar Slam To Pune Police About Drugs Racket

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीवर वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार

‘अटल सेतू’ प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

‘या समाजालाही ओबीसातून आरक्षण द्या’; मनोज जरांगेंची मोठी मागणी

मोठी बातमी! पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी

‘आराध्या बच्चन आणि माझं हे नातं…’; अखेर सलमान खानकडून सत्य बाहेर

Join WhatsApp Group

Join Now