पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं

On: May 19, 2024 1:47 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणे शहरात (Pune News) अनेकदा वाहन चालक हे नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. यामुळे गुन्हेगारीप्रमाणे पुणे शहरात वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असून यामुळे अपघात होताना दिसत आहेत. वाहन चालवण्यासाठी वाहन चालकांचं वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असावं असा नियम आहे. मात्र पुण्यातील कल्याणीनगरच्या परिसरात पोर्शे गाडीने दोघांना उडवले. पोर्शे गाडीचा वाहन चालक हा अल्पवयीन असून 17 वर्षांचा होता. त्याने दोघांना उडवले. त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. (Pune News)

पोर्शे चारचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले

पुणे शहरातील (Pune News) कल्याणीनगर येथे एका चारचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने दोघांना भररस्त्यात उडवले. त्यामध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश होता. ते दोघेही पार्टिवरून परतले होते. तेव्हा ही दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी येरवडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. कारचालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली

हा सगळा प्रकार शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर जवळ घडला. फिर्यादीनुसार, हॉटेलमधून ते पार्टी करून जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने गाडीला वेग दिला. त्यानंतर त्या कारचालकाने अनिस अवधिया याच्या दुचाकीला धडक दिल्याने अनिस अवधिया आणि मैत्रीण अश्विन कोस्टा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मध्यरात्री असलेले नागरिक घटनास्थळी गोळा झाले आणि अल्पवयीन मुलाला चांगलाच चोप दिला आहे. कारचालक हा घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याठिकाणी नागरिकांनी भररस्त्यात त्याला अडवून धरलं आणि त्याला चांगलाच चोप देण्यात आला. हा प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याची माहिती समोर आली असल्याची चर्चा आहे, मात्र अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

पोर्शेसारखी गाडी विनापरवाना चालवणारा मुलगा हा अल्पवयीन होता. या देशात अशी अनेक मुलं आहेत. यांच्यामुळे दररोज अनेकांचे अपघात होताना दिसतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन होताना दिसते.

News title – Kalyani Nagar Porsche Car Accident

महत्त्वाच्या बातम्या

“बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे तुम्हाला माहित नसेल”

‘गुलाल आपलाच…’; निकालाआधीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर्स झळकले

बापरे! चप्पल व्यावसायिकाकडे मिळाली कोटींची संपत्ती; नोटा मोजून अधिकारीही थकले

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती

“बॉयफ्रेंडने बाथरुममधला व्हिडिओ..”; पुनम पांडेचा पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा

Join WhatsApp Group

Join Now