Pune News | पुणे (Pune News) येथील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दुचाकी चालवणाऱ्यांना आपल्या चारचाकी गाडीने उडवलं. पुन्हा एकदा पुणे शहरात (Pune News) पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आमदाराच्या पुतण्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र मयुर मोहिते याची न्यायालयीन कोठडी रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
पोलीस कोठडी न मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात मयुरने दोघांना चिरडलं. या प्रकरणात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पोलीस कोठडी न मिळाल्याने मंचर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होताना दिसत आहे. अखेर आरोपी मयुर मोहितेची पोलीस कोठडी मिळवण्यावर मंचर पोलीस अपयशी ठरल्याने, त्यावर शिक्कामोर्तब झाला. (Pune News)
मयुरच्या जामीनाचा मार्ग मोकळा
घोडेगाव न्यायालयाने मयुरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. मात्र अपघातानंतर काही तासांमध्येच मयुरच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली असती तर नक्कीच मयुरला पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मिळवून दिली असती. (Pune News)
दरम्यान, पोलीस आधीपासूनच दबावात काम करत आहेत. त्यामुळे ते निःपक्षपातीपणे काम करत नसल्याचं दिसून आलं. न्यायालयाने गंभीर गुन्ह्यातही आरोपीला थेट न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर शिक्कामोर्तब होण्याबाबतची शंका नाकारता येत नाही.
घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी मयुरने मद्यपान केलं असल्याचा दावा केला आहे. यावर दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, माझा पुतण्या कधीही दारू पिला नाही. तो इंजिनिअर आहे. तो कधीही आयुष्यात दारू प्यायला नाही. त्यामुळे असले प्रकार त्याने केले नसल्याचं दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.
News Title – Pune News Mohite Patil Nephew Mayur Mohite After Accident Granted Bail
महत्त्वाच्या बातम्या
पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीवर वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार
‘अटल सेतू’ प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!
‘या समाजालाही ओबीसातून आरक्षण द्या’; मनोज जरांगेंची मोठी मागणी
मोठी बातमी! पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी
‘आराध्या बच्चन आणि माझं हे नातं…’; अखेर सलमान खानकडून सत्य बाहेर






