पुणे हादरलं! शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणीसोबत घडला भयानक प्रकार

On: April 8, 2024 2:22 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोयता गँगची दहशत त्यानंतर छोट्या गोष्टींमुळे मोठे गुन्हे घडत आहेत. दरम्यान पुण्यात महिलांवर होत असलेल्या आत्याचाराचं प्रमाण देखील वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीची हत्या करण्यात आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ही तरुणी वाघोली येथून बेपाता झाली होती. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर तरुणीच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण पुणे हादरलं.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या (Pune News) वोघोली येथे भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही तरुणी इंजीनियरिंगचे शिक्षण घेत होती. दरम्यान, भाग्यश्रीने 30 मार्च रोजी तिच्या कुटुंबासोबत संपर्क केला होता. यावेळी भाग्यश्रीचं तिच्या आईसोबत बोलणं झालं होतं. मात्र 31 मार्च पासून भाग्यश्रीचा मोबाईल बंद होता. त्यानंतर दोन एप्रिलला भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर तुमच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं असून तिच्या सुटकेसाठी नऊ लाख रुपये तातडीने द्या, असा मेसेज आला होता.

त्यानंतर, भाग्यश्रीचे वडिल तातडीने पुण्यात (Pune News) आले. आणि य बाबतची माहिती विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर भाग्यश्रीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपींनी तिचा मृतदेह नगर जिल्ह्यातील सुपा गावाजवळ एका शेतात पुरून ठेवला होता.

पुढे काय घडलं?

30 मार्च रोजी भाग्यश्रीचं बोलण तिच्या आईसोबत झालं होतं. या वेळी मी मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचं आईला सांगितलं. त्यानंतर, अचनाक भाग्यश्रीचा फोेन बंद लागल्याने तिच्या कुटुंबानी शोध सुरु केला. मात्र, 2 एप्रिल रोजी तिच्या फोनवरुन घरच्यांना मेसेज घेल्यानंतर भाग्यश्रीचे कुटुंब पुण्यात पोहोचले.

कर्ज झाल्याने भाग्यश्रीचा खून-

दरम्यान, भाग्यश्री तिचा मित्रा शिवम यांने हे सगळं घडून आणलं. पोलिसांनी शिवमला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली. आरोपी शिवम फुलावळे कर्जबाजारी झाला होता. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास पैसे मिळतील, असं त्याला वाटलं होतं. त्यामुळे त्याने भाग्यश्रीला संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

News Title : pune news engineering girl get murdered

महत्त्वाच्या बातम्या-

अर्धशतक हुकलं तरीही रोहितने मोडला धोनीचा विक्रम!

बहुप्रतीक्षित ‘पुष्पा: द रूल’चा टीजर रिलीज; अल्लू अर्जुनच्या हटके लुकने वेधलं लक्ष

सलमान खान राजकारणात करणार प्रवेश?; ‘या’ बड्या नेत्याने घेतली भेट

भाजपत प्रवेश करताच खडसेंना मिळणार मोठं गिफ्ट?

अल्लू अर्जुन आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now