Pune News | पुणे (Pune News) शहर हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. पुणे पोर्शे अपघात प्रकरण ताजं असताना खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने पुणे (Pune News) पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती केली आहे. त्यानंतर आता पुणे (Pune News) शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. यावर आता विरोधकांना सत्ताधाऱ्यांचे कान उपटले आहेत. (Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. पुणे शहराची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे, अशी टीका आता जयंत पाटील यांनी केली आहे. (Pune News)
जयंत पाटलांचं ट्विट चर्चेत :
गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. पोलिसांना गुन्ह्यांची माहिती त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे.
अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत.
गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 24, 2024
‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’
‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे.
News Title – Pune News Drugs Case Jayant Patil Slam To Maharashtra State Government
महत्त्वाच्या बातम्या
लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणते मुद्दे गाजणार?
सोनाक्षी-झहीरने ग्रँड रिसेप्शन पार्टीत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
…तर रोहितसेना ऑस्ट्रेलियाचा वचपा काढणार? कांगारूंना दाखवणार घरचा रस्ता
विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा लढवणार? जाणून घ्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला






